या चिमण्यांनो परत फिरा रे... : सत्यमेव जयतेचा विशेष भाग
मित्रांनो ,
आपल्याला माहीतच आहे कि आमीरच्या सत्यमेव जयतेचे तेरा भाग तयार आहेत. त्यातल्या पाच भागांचे प्रक्षेपण हे डिस्क्लेमर लिहीपर्यंत झालेले आहे. पण एक भाग असा आहे कि ज्याचे प्रक्षेपण आता लगेच होणार नाही. हा एक विशेष भाग असून, विशिष्ट वेळी त्याचं प्रक्षेपण होईल असं समजतं. आमच्या हातात त्याची सीडी लागल्याने त्या भागाचा यथासांग वृत्तांत वाचकांसाठी समोर ठेवत आहे. डिस्क्लेमर : या लेखात आलेले प्रसंग, नावं आणि व्यक्ती काल्पनिक असून कुठल्याही प्रकारच्या साधर्म्याबाबत काही तक्रार असल्यास वाचण्यापूर्वीच थांबावे ही नम्र विनंती.