Submitted by आनंदयात्री on 20 May, 2012 - 01:39
आज दि २० मे ला प्रसारित झालेल्या तिसर्या भागाबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा..
सत्यमेव जयतेच्या वेबसाईटवरील लिंक - http://www.satyamevjayate.in/issue03/
सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विषय तर लिहा साहेब वर ...
विषय तर लिहा साहेब वर ...
विषय काय आहे?
विषय काय आहे?
भाग संपल्यावर लिहितो..
भाग संपल्यावर लिहितो..
आजचा भाग आहे हुंडा जन
आजचा भाग आहे हुंडा
जन -जागृतीचा उद्देश सफल होतो आहे ,पण उपाय ही सांगितले पाहिजेत
हुंडा रोखण्यासाठी ठोस उपाय-योजना आणि कार्यक्रम समजावून सांगितलं पाहिजे होतं आमीर ने
अजून संपायचाय भाग.
अजून संपायचाय भाग.
गाणे.. छान आहे. रुपैय्या
गाणे.. छान आहे. रुपैय्या
http://www.satyamevjayate.in/issue03/videos/?id=TTlZLkpxfI0&title=Episod...!
आसाम प्रमाणेच कोकण भागातही
आसाम प्रमाणेच कोकण भागातही अशीच प्रथा आहे ,
ग्रामीण भागातील लग्नात हुंडा नसतो
आणि हो, मुलीचे सर्व दागिने /कपडे मुलाने द्यायचे
मुलाला फक्त पोशाख आणि अंगठी मुलीकडून द्यायची!
लग्नाचा खर्च ज्याच्या घरी लग्न असेल त्याने करायचा [मुलगा/मुलगी]
ग्रामीण भागातील लग्ने मुलाच्या किंवा मुलीच्या घरीच होतात , हॉल वगैरे पद्धती नाहीत
ग्रामीण भागातील लोकांकडून
ग्रामीण भागातील लोकांकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे ....
शहरातील लोक शिकून सवरून नक्की सुधारतात की बिघडतात ?...
कुठे चाललाय आपला समाज ????????????????????????
समाजाला शरमेने मान खाली
समाजाला शरमेने मान खाली घालायला लावणारी बाब म्हणजे हुंड्याच्या नावाखाली होत राहाणारी अन्य लूट....ज्या गोष्टी 'याद्या'च्या वेळी ठरलेल्या नसतात नेमक्या त्याच्या फांद्या अक्षताच्या तारखेपर्यंत अशा काही विस्तारतात की देऊ शकणाराही थकतो तर न देऊ शकणार्याचे तर कंबरडेही मोडते....अशी एकदोन उदाहरणे आमीरने आजच्या भागात दाखविली आहेतच.
चीड येते ती 'मी किती हायली क्वालिफाईड फेलो आहे' हे दाखविण्याची मिजाशी दाखविणार्या स्नातकांची जे 'मला हुंडाबिंडा काही नकोय, पण आईबाबा या संदर्भात जे म्हणतात त्याला मी विरोध करणार नाही..." अशी निर्लज्ज भलावण करीत राहतात.
पिढ्यानपिढ्या चालणारा हा विषय आहे, जो आमीरच्या एका एपिसोडने संपुष्टात येईल असे मानताही येणार नाही. असे असले तरी कार्यक्रमाच्या अखेरीस आमीरने थेट मुलीनाच या संदर्भात जे आवाहन केले आहे त्याला मुलीनीच सशक्तपणे पॉझिटिव्ह प्रतिसाद दिला तर निदान काही अंशी या प्रथेला लगाम बसू शकेल अशी आशा आहे.
त्या 'राणी' मुलीच्या धाडसास सलाम !.....आणि राजाच्या निर्णयाबद्दल त्याचे अभिनंदन.
अशोक पाटील
आजचा विषय म्हणजे गेल्या
आजचा विषय म्हणजे गेल्या अनेकानेक वर्षांपासून ज्या समस्येने (!) आपल्या समाजाला ग्रासले आहे तो
" विवाह आणि हुंडा" होता.
२१ व्या शतकात इतक्या बुरसटलेल्या विचारांची लोक आपल्या समाजात आहेत याच वैषम्य वाटाव की कीव?
पण या कार्यक्रमाची एक गोष्ट मनापासून आवडली ती म्हणजे कुठेही निराशेचा सूर न आळ्वता एक आशेचा किरण दाखवला जातो, त्यामुळे मनात आणल तर आपण ही परिस्थिती बदलू शकू, त्यात खारीचा वाटा उचलू शकू असा विश्वास निर्माण होतो मनात!
आजच्या भागात शेवटाकडे जिच्याबद्दल दाखवल त्या रानी त्रिपाठी च्या धाडसाला आणि समयसूचकतेला खरच सलाम! हुंडा मागायला घरी आलेल्या भावी सासु सासर्यांच स्टींग ऑपरेशन करुन ते प्रसारीत करण म्हणजे हॅट्स ऑफच!
हुंडा दिलेला नाही आणि
हुंडा दिलेला नाही आणि घेतलेलाही नाही अशा सर्वांचे सर्वप्रथम अभिनंदन. हुंड्याचे बळी ठरलेले आणि अभिनंदनास पात्र ठरलेल्या लोकांनी आपले अनुभव आणि मतं मांडावीत ही विनंती..
कोकणात हुंडा हा प्रकारच मुळात
कोकणात हुंडा हा प्रकारच मुळात नाही, लग्नाचा खर्च ज्याने त्याने आपआपल्या कडचा स्वत: करायचा. मुलीच्या दाग-दागिनेही मुलानकडच्यानीच करायचे. त्यामुळे इथे कुणालाही मुलगी जन्माला आली तरी त्याचे दुखः वगैरे नसते. हुंडा हा प्रकार माझ्यापहाण्यातरी मोठ्याप्रमाणात घाटावर, खानदेश आणि मराठवाडा या भागात फार जास्त दिसतो, म्हणजेच नवरमुलगा रस्त्यावर भाजी विकत असलातरी लग्नात मुंलीकडुन त्याला हुंड्यात किमान मोटरसायकलची तरी अपेक्षा असते. आणि हा प्रकार स्वत:ला फार उच्चभ्रु म्हणवणार्यांमधेच फार जास्त दिसतो.
नेहमीप्रमाणेच उत्तम होता
नेहमीप्रमाणेच उत्तम होता आजचाही एपिसोड ! 'सत्यमेव जयते' च्या टीमचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.
वर अशोक पाटील यांनी म्हटले त्याच्याशी मी पूर्णतः सहमत आहे. तरूणांनी मनात आणले तर ही प्रथा संपायला जास्त वेळ लागणार नाही. एरवी आपल्या बर्या-वाईट सगळ्या मागण्या आईबापाच्या गळी उतरवणारे तरूण, हुंडा घेतांना नेमके 'तुम्ही म्हणाल तसं' करत त्यांच्या पदरामागे लपतात, हे निंदनीय आहे.
मला सोना माहोपात्राचे गाणेही फार आवडले. "मुझे क्या बेचेगी रुपैय्या !"
एक्कच नंबर.
"आणि हा प्रकार स्वत:ला फार
"आणि हा प्रकार स्वत:ला फार उच्चभ्रु म्हणवणार्यांमधेच फार जास्त दिसतो....."
~ नाही विजयराव, केवळ उच्चभ्रु म्हणविणार्यांमध्येच नव्हे तर अगदी आर्थिकदृष्ट्या ज्या घटकाला तळाचे समजले जाते तिथल्या फाकडूलाही 'मुलीकडील लोकांनी मला "धम्मक पिवळे" केले पाहिजे" असे वाटते. कोल्हापूर भागात सोने मुलीला किती घालणार ? हाच प्रश्न प्रथम पटलावर असतो....आणि तो विषय झाला की मग 'मुलाला किती पिवळे करणार?" हा उपप्रश्न. [इथल्या उच्चभ्रूंच्या....विशेषतः साखरेच्या पैशाने माज आलेल्या हत्तींच्या.... लग्न देवाणघेवाणीच्या पाहणीने त्रयस्थ ऐकणार्याचे डोळे पांढरे होतील.]
होंडा, पॅशन, डिस्कव्हर, बजाज ही नावे तर शेंगदाण्याफुटाण्यासारखी पोरेही घेत असतात लग्नाच्या वाटाघाटीवेळी...मग हा शेंगदाणा महाद्वार रोडवरील कापडाच्या दुकानात हजेरीवर कामगार असला तरी.
खड्ड्यात रुतलेल्या 'केएमटी' बस सर्व्हिसमध्ये 'हेल्पर' पदावर रोजंदारी करणार्या पोराच्या घरातील लोकांनी मुलीकडून लग्नाखर्चासह चक्क बुलीट मागितली होती. त्या वाघ्याला त्याचे स्टॅण्डही लावता आले नसते, पण मागणी कायम.
यासाठी का होईना त्या नॉर्थईस्ट सेक्टर राज्यांच्या रितीचे अभिनंदन करावे लागेल.
अशोक पाटील
यासाठी का होईना त्या
यासाठी का होईना त्या नॉर्थईस्ट सेक्टर राज्यांच्या रितीचे अभिनंदन करावे लागेल.
अगदी हेच म्हणतो.
मघाशी लिहायचे राहिले, पण नॉर्थ-ईस्ट वाले याबाबतीत अभिनंदनास पात्र आहेत.
आपल्याकडे विदर्भात होणार्या
आपल्याकडे विदर्भात होणार्या शेतकर्यांच्या आत्महत्येमागे 'मुलीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज' हे एक प्रमुख कारण आहे. आजच्या कार्यक्रमात याही मुद्द्याला स्पर्श केला गेला.
जिच्या बापाने लग्नातल्या कर्जापोटी आत्महत्या केली, अशा एका वैदर्भीय मुलीला "निदान आतातरी तुझा संसार सुखाचा आहे का" असे विचारले. त्यावर ती काहीच बोलली नाही, फक्त विषण्णपणे हसली.
तिचे ते हसणे काळीज हेलावणारे होते !
आणि हा प्रकार स्वत:ला फार
आणि हा प्रकार स्वत:ला फार उच्चभ्रु म्हणवणार्यांमधेच फार जास्त दिसतो..<<<
नाही. घरी काम करायला येणार्या बायकांच्या घरांमधेही हे भरपूर दिसते.
कमवत काडीचाही नसला तरी त्या मुलाला लग्नात महागातली वाजंत्री पासून बरंच काय काय हवं असतं...
एवढंच नव्हे तर बाळंतपणात(पहिल्या बाळंतपणापासून जेवढी होतील तेवढी सगळी!) आयर्नची इंजेक्शन्स द्यायची तर ती पण माहेरून. हे लोक तिला शिळपाकं जेवायला देऊन आपण थोर काम केल्याच्या आविर्भावात बसणार.
जिच्या बापाने लग्नातल्या
जिच्या बापाने लग्नातल्या कर्जापोटी आत्महत्या केली, अशा एका वैदर्भीय मुलीला "निदान आतातरी तुझा संसार सुखाचा आहे का" असे विचारले. त्यावर ती काहीच बोलली नाही, फक्त विषण्णपणे हसली.
तिचे ते हसणे काळीज हेलावणारे होते ! <<<
नक्कीच
बु-हाणपूर मॉडेल खासच.
बु-हाणपूर मॉडेल खासच. सत्यशोधक मंडळींतर्फेही सामुदायिक विवाह केले जातात ..
ज्ञानेश .... "तिचे ते हसणे
ज्ञानेश ....
"तिचे ते हसणे काळीज हेलावणारे होते !"....
अगदीअगदी....त्यावेळी 'कॅमेरा' किती बोलका झाला हे उमगले. माध्यमाची ताकद काही वेळा लिखित शब्दांपेक्षाही किती प्रभावी होऊ शकते याचे नेमके उदाहरण म्हणजे तो प्रसंग होय.
अशोक पाटील
नॉर्थ इस्टमध्ये
नॉर्थ इस्टमध्ये स्त्रीभ्रूणहत्याही नाही असे आमीरच्या आकाशवाणीवरच्या कार्यक्रमातून कळले होते.
फक्त विषण्णपणे हसली. तिचे ते
फक्त विषण्णपणे हसली. तिचे ते हसणे काळीज हेलावणारे होते ! <<< काही वर्षां पुर्वी आमच्या शेजारी रहाणार्या कुंटुंबातील ताईची आठवण झाली. वडिल गिरणी कामगार... त्यामुळे परिस्थीती बेताची.. ताईच्या मागे दोन लहान भाऊ शिकत होते. त्यांच्या सोबत आमचा चांगला घरोबा होता. मे महिन्याच्या सुट्टीत गावाला गेले नी तिथेच अचानक ताईचे एका विदुराशी लग्न उरकून आले. तेव्हा आम्हाला फारच धक्का बसला. मुलगी झाल्यावर तिला फारच अत्याचार सहन करावे लागले नी एके दिवशी तिने आत्महत्या केली? (का तसे भासवले गेले). आज इतक्या वर्षांनी त्या विधर्भातल्या मुलीचे विकट हास्य बघताना ताईचा चेहरा आठवून फार उदास झालो.
बु-हाणपूर मॉडेल खासच. >> अगदी अगदी
"बडी शादी चाहिये तो लडकी और लडके अपने पैसेसे शादी करे... ना की parents की पैसेसे" शेवटी एका तरुणीने दिलेला हा संदेश सगळ्या अविवाहीत तरुणांनी अंमलात आणला तर खूप फरक पडेल.
अशोक, सहमत. कनिष्ठ वर्गामधे
अशोक, सहमत. कनिष्ठ वर्गामधे असलेल्या हुंड्याची पद्धत वाईटच. पण उच्चभ्रू समाजामधे असलेली पद्धत मलातरी किळसवाणी वाटते. अक्षरशः भीक मागल्यागत मागण्या घालतात.
इथे तूळू भागामधे तोळा ग्रॅममधे सोने घालतच नाहीत. किलोच्या हिशोबानेच. मुलगी जन्मली की आईबाप महिन्याला एक एक ग्रॅम सोने जोडत जातात म्हणे.
बाकी, त्या संतोष कुमारची स्टोरी एकदम मजेदार होती.
"इथे तूळू भागामधे तोळा
"इथे तूळू भागामधे तोळा ग्रॅममधे सोने घालतच नाहीत. किलोच्या हिशोबानेच."
होय नंदिनी....आणि दुर्दैवाने मी स्वतः अशा एका लग्नाला मुलीतर्फे हजर राहिलो होतो याचे वैषम्य मला सतत वाटत राहिले. डॉ.सीमा सुब्रह्मण्यम असे त्या मुलीचे नाव. जावई गायनॉकॉलिजस्ट मिळाला म्हणून मि.रंगनाथन सुब्रह्मण्यम [जे माझे ऑडिट विभागातील एक ज्येष्ठ सहकारी, मूळचे 'विल्लूपरम [पॉण्डेचरी झोन]' जिल्ह्यातील, नोकरीनिमित्य मुंबई-पुणे इथे. मुलगा जरी कृष्णागिरीचा होता तरी त्याला चेन्नई वा तिरुवल्लूर इथे प्रॅक्टीस करण्याची इच्छा होती आणि स्वतंत्र दवाखान्यासाठी लागणारी सामग्री ही सुब्रह्मण्यम फॅमिलीने द्यावी अशी मागणी. ही माहिती मि.रंगनाथन यानी आम्हा मित्रांना अशी काही सांगितली की जणू काही ते आता चिरमुरेफुटाणे खरेदी करायला बाहेर जाणार आहेत, इतक्या सहजतेने.
पुढे समजले की तो साधनांचा सारा सेट जवळपास ८५ लाख रुपयांना [ए.सी.सह] त्याना पडला. बाप रे ! ८५ लाख रुपये ? शिवाय सीमासाठी तिच्या आईने तुम्ही वर म्हटल्याप्रमाणे तिच्या लहानपणापासून जमा केलेले ग्रॅमच्या हिशोबाचे शिलकी सोने तर किती होते त्याला मोजमापच नव्हते. आम्ही 'मद्रास' पाहाण्याच्या निमित्ताने ह्या लग्नाला गेलो होतो. ८५ लाख + भरपूर सोने...यांच्याबरोबरीने वराकडील स्त्रीवर्गाला दिलेल्या साड्यांची जातकुळी पाहताना आम्हा महाराष्ट्रीयन टीमला तर भोवळच यायची पाळी आली होती.
बाजार...अक्षरश: बाजार आणि पैशाची लूटमार चालते तुळू लग्नात.
काय त्या सीमाचा "डॉक्टर" डीग्रीचा आणि या परंपरेचा एकमेकाशी संबंध ? बरे, हे चाललेही होते राजीखुशीनेच.....काय करणार आमीर खान तरी अशा मंजुरी लग्नात?
अशोक पाटील
मान्यवर श्री. आमिर खान
मान्यवर श्री. आमिर खान ह्यांच्या आजच्या ’सत्यमेव जयते’ ह्या कार्यक्रमातून लक्षात आलेली सूत्रे:
१. ’दहेज बळी’ ही समस्या फक्त हिंदू धर्म व इतर भारतीय मूळ असलेल्या धर्मांतच आहे.
२. मुस्लिम विवाहपद्धतीत कोणतेही दोष नाहीत.
३. उलटपक्षी केवळ मुसलमानच प्रगत हुंडाविरोधी चळवळी राबवत आहेत - उदा. बुर्हाणपूर. तसे उपक्रम हिंदू समाजाला अजून स्वप्नातही सुचलेले नाहीत.
४. बहुपत्नित्व, तीनदा ’तलाक’ शब्द म्हटल्यावर कोणत्याही मुस्लिम महिलेचे निराधार होणे ही हिंदू विवाह पध्द्तीतील समस्या आहे.
५. लव्ह जिहादमुळे धर्मांतर होवून मुस्लिम मुलांशी विवाह झालेल्या हिंदू, ख्रिस्ती, बौद्ध, शीख व इतर भारतीय धर्मीय व भारतीय वंशाच्या मुली अरबी देशात विकून त्यांना वेश्याव्यवसायाला लागून नरकयातना भोगाव्या लागत आहेत हासुद्धा हिंदूंच्या विवाहपध्दतीतला दोष आहे.
६. ज्या लाखो दुर्दैवी मुली धर्मांतर व मुस्लिम समाजात विवाह होवून भारतातून बेपत्ता झालेल्या आहेत, त्या मुलींच्या समस्या सुद्धा भारतीय विवाह पद्धतीशीच निगडीत आहेत.
७. मुस्लिम समाजातील विवाहित पुरुषही भारतीय वंशातील मुलींना आपण अविवाहित असल्याचे सांगून फसवून व त्यांना ब्लॅकमेल करून, त्यांच्याशी शरीरसंबंध जोडून, त्यांच्या शीलाशी स्वत: खेळणे व आपल्या समाजबंधूंनाही त्यात सामिल करणे, प्रकरण गळ्यापर्यंत आल्यावर त्यांचा खून करणे... हे प्रकार फक्त भारतीय विवाह पध्दतीच्या समस्या आहेत. ह्यात मुसलमानांचा काहीही हात नाही.
वाह आमिर! सत्यमेव जयते!
स्वागतम.... याचीच वाट पहात
स्वागतम.... याचीच वाट पहात होतो.
जामोप्या.......
जामोप्या.......
>>कोकणात हुंडा हा प्रकारच
>>कोकणात हुंडा हा प्रकारच मुळात नाही, लग्नाचा खर्च ज्याने त्याने आपआपल्या कडचा स्वत: करायचा.
>>मघाशी लिहायचे राहिले, पण नॉर्थ-ईस्ट वाले याबाबतीत अभिनंदनास पात्र आहेत.
अनुमोदन.
मीरा जोशी यांच्या पोस्टलाही
मीरा जोशी यांच्या पोस्टलाही संपूर्ण अनुमोदन.
आजचा भागातला दोष हाच की मुसलमान कसे प्रगत आणि त्यांच्यातच कसे पुढारलेपणा आहे असा समज होण्याची शक्यता आहे बघणार्यांची (तो कार्यक्रमाचा उद्देश नक्कीच नाही, पण तसा समज होऊ शकतो). आणि गंमत म्हणजे हुंडा न घेता आणि स्वस्तात निकाह केल्यावर - लग्न झाल्यावर नंतर संसार सुखाचा होतोच याची काय हमी? मुसलमान पुरुष काय छळ करत नाहीत का? जणू काही हिंदू समाजात कुणी चांगले वागतच नाहीत? कैच्याकै. सुदैवाने रानी त्रिपाठीची कथा दाखवून आपल्यातही प्रगत पुरुष आहेत हे दिसले ते बरे झाले.
हा आक्षेप ग्राह्य धरला तरीही आपल्यात शिरलेल्या हुंडा वगैरे सदोष प्रथांचे उच्चाटन करायलाच हवे व त्यासाठी होणार्या सगळ्या प्रयत्नांना पाठींबा द्यायलाच हवा.
मीरा जोशी. तुम्हाला मुक्ताफळे
मीरा जोशी. तुम्हाला मुक्ताफळे उधळायची असतील तर आपण उधळू शकता. पण त्यासाठी जरातरी तारतम्य दाखवाल का?
Pages