तेव्हा
होतो प्रसिद्ध मोठा ओवाळलेस तेव्हा
कीर्ती विरून गेली तू टाळलेस तेव्हा
प्रीती तुझी हवीशी सर्वात जास्त होती
वाटेत चालताना तू गाळलेस तेव्हा
तावून आज झालो सोने तुझ्या कृपेने
कच्चा अपूर्ण होतो तू जाळलेस तेव्हा
शिकलो जगावयाला अपसूक एकटा मी
झाले बरेच, नाही सांभाळलेस तेव्हा
समजावुनी मनाला 'तुष्की' सुखात होता
का तू वळून मागे न्याहाळलेस तेव्हा
तुषार जोशी, नागपूर 'तुष्की'
+९१ ९८२२२ २०३६५
२१ मार्च २०१२, १०:००