Submitted by तुषार जोशी on 22 March, 2012 - 00:45
सुख नेहमीच नसते समजायला हवे ते
लपवून दु:ख हसणे जमवायला हवे ते
जगतात यातनांचे थैमान घालणारे
फासावरी कधीचे लटकायला हवे ते
होता कटाक्ष साधा पण आरपार झाला
केंव्हातरी तिलाही कळवायला हवें ते
आभाळ चांदण्यांचे नि:शब्द संथ झाले
हिंदोळत्या सुरांनी ढवळायला हवे ते
हे वेड आसवांचे साधे नव्हेच 'तुष्की'
जाळूिनया सुखाला मिळवायला हवे ते
तुषार जोशी, नागपूर 'तुष्की'
+९१ ९८२२२ २०३६५
२० मार्च २०१२, २२:३०
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
होता कटाक्ष साधा पण आरपार
होता कटाक्ष साधा पण आरपार झाला
केंव्हातरी तिलाही कळवायला हवें ते>> व्वा
आभाळ चांदण्यांचे नि:शब्द संथ झाले
हिंदोळत्या सुरांनी ढवळायला हवे ते>> मस्त
तुषारराव बरेच दिवसांनी तुमची गझल मिळाली वाचायला
होता कटाक्ष साधा पण आरपार
होता कटाक्ष साधा पण आरपार झाला
केंव्हातरी तिलाही कळवायला हवें ते
शेर खूप आवडला.
मस्त झालीये गझल. शेवटचा शेर
मस्त झालीये गझल.
शेवटचा शेर - अर्थ लक्षात नाही आला ( तुष्की )
होता कटाक्ष साधा पण आरपार
होता कटाक्ष साधा पण आरपार झाला
केंव्हातरी तिलाही कळवायला हवें ते....व्वा
'हवे ते' ऐवजी 'हवे हे' अशी रदिफ घेतली तर?
सर्व शेराइतकेच आपले तखल्लुस
सर्व शेराइतकेच आपले तखल्लुस मस्तय
होता कटाक्ष साधा पण आरपार
होता कटाक्ष साधा पण आरपार झाला
केंव्हातरी तिलाही कळवायला हवें ते
वा वा!
आवडली
आवडली
मस्तच! नानुभाऊ
मस्तच!
नानुभाऊ
सुप्रियाजींच्या मताशी
सुप्रियाजींच्या मताशी सहमत.
हवे ते -- प्रत्येक शेरात तितकसं समर्पक वाटत नाहीये. बाकी गझल छानच आहे.
सर्वांचे आभार
सर्वांचे आभार
'हवे ते' ऐवजी 'हवे हे' अशी
'हवे ते' ऐवजी 'हवे हे' अशी रदिफ घेतली तर?
'हवे हे' असे घेतले तर ह-ह या अक्षरांचे एक अंतरयमक जुळेल. ते बरोबर वाटणार नाही.
गझल अतिशय सुंदर.
'हवे हे' असे घेतले तर ह-ह या
'हवे हे' असे घेतले तर ह-ह या अक्षरांचे एक अंतरयमक जुळेल. ते बरोबर वाटणार नाही.>>
अंतरयमक म्हणजे काय?
आंतरयमक म्हणजे एकाच ओळीत
आंतरयमक म्हणजे एकाच ओळीत आलेल्या दोन शब्दांमधले उच्चार साधर्म्य.
जसे खालील ओळीत चपल आणि चरण यात असलेले अंतरयमक.
"शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले"
खालील ओळीत वत्सल व वास यातील व या अक्षरामुळे साधलेले अंतरयमक.
'वत्सल ये वास, भूमी आशीर्वच बोले'
दोन्ही ओळी बोरकरांच्या आहेत.
नाही समजले अजूनही
नाही समजले अजूनही
सवडीने विपू त लिहितो.
सवडीने विपू त लिहितो.
ओके, धन्यवाद त्याचा
ओके, धन्यवाद
त्याचा गंझलतंत्राशी कसा संबंध येतो तेही कृपया नोंदवावेत
आभाळ चांदण्यांचे नि:शब्द संथ
आभाळ चांदण्यांचे नि:शब्द संथ झाले
हिंदोळत्या सुरांनी ढवळायला हवे ते>> मला हा शेर फारर्च आवडला, तुषार
ही संपूर्ण गझल 'हवे ते' हा
ही संपूर्ण गझल 'हवे ते' हा रदीफ मनात ठेवूनच लिहिलेली आहे म्हणून तो बदलून चालणार नाही. शेरांमधे खास 'हवे ते' ला साजेल अश्या गोष्टी योजल्या आहेत. हवे हे वापरायला सर्व गोष्टी जवळ असायला हव्या, हवे ते मधे तसे लागत नाही.
होता कटाक्ष साधा पण आरपार
होता कटाक्ष साधा पण आरपार झाला
केंव्हातरी तिलाही कळवायला हवें ते..............मस्तच एकदम
सर्वांन धन्यवाद! आंतरयमकाची
सर्वांन धन्यवाद!
आंतरयमकाची चर्चा उद्बोधक आहे.
उमेश वैद्य, अंतरयमक ही कुतुहल
उमेश वैद्य,
अंतरयमक ही कुतुहल निर्माण करणारी आणि बर्याच जणांना माहीत नसलेली संकल्पना इथेच विशद करावीत ही नम्र विनंती. चर्चा सर्वांना उपयुक्त ठरत असल्यास उघड करण्यास हरकत नसावी.
सगळेच बेफिकीर ह्यांची विपू वाचतील असे नाही परंतू माहीती सर्वांनाच हवी असावी.
कटाक्ष आरपार गेला हो
कटाक्ष आरपार गेला हो
अप्रतीम गझल!!
अप्रतीम गझल!!
उमेश वैद्य, आपण माझ्या विपूत
उमेश वैद्य,
आपण माझ्या विपूत लिहिलेली माहिती वाचली व आवडली.
या गझलेवर चर्चा झाल्यास फायदेशीर ठरेल असे वाटल्याने येथे लिहीत आहे.
अंतरयमक ही संकल्पना छान आहे. अनुप्रास अलंकार व अंतरयमक यात काही फरक आहे काय असेही विचारावेसे वाटले.
अंतरयमक मुद्दामून घेण्याचा हेतू, आपोआप येण्यातील सौंदर्य हे सर्वच मुद्दे छान वाटले.
अंतरयमक हा शब्द काहीसा अपुरा वाटला, म्हणजे एखाद्या ओळीत सातत्याने येऊन कर्णमधूर ठरणार्या अक्षरास यमक असे संबोधले जाणे हे काहीसे अपुरे किंवा अचूक नसल्यासारखे वाटले.
अर्थातच, आपण दिलेली माहिती अंतरयमकाबाबत आहे व अशा संकल्पनेचा गझलतंत्राशी संबंध नाही (नसणार) हे आपणही जाणताच (व असे मला निश्चीतपणे वाटते).
(वरील गझलेत 'हवे हे' ही रदीफ घेणे अयोग्य ठरण्यावर अंतरयमक या संकल्पनेचा काही प्रभाव पडत नाही, पडू नये व तसे समजले जाऊ नये असे माझे मत आहे)
धन्यवाद
-'बेफिकीर'!
अंतर यमका पेक्शा 'हवे हे' हे
अंतर यमका पेक्शा 'हवे हे' हे लयीत म्हणायला थोडा त्रास होईल..
उदा.. 'दिसताच चांदणेही' हे वृत्तात असूनही ओळीने दोन 'च' आल्याने लय थोडी गंडते...
बाकी 'हवे ते' रदीफ इतके नीट निभावले गेले नाहीये ह्या इतर काही जणांच्या मताशी सहमत आहे...
होता कटाक्ष साधा पण आरपार झाला
केंव्हातरी तिलाही कळवायला हवें ते. >>> हा शेर आवडला