तेव्हा

Submitted by तुषार जोशी on 22 March, 2012 - 00:49

होतो प्रसिद्ध मोठा ओवाळलेस तेव्हा
कीर्ती विरून गेली तू टाळलेस तेव्हा

प्रीती तुझी हवीशी सर्वात जास्त होती
वाटेत चालताना तू गाळलेस तेव्हा

तावून आज झालो सोने तुझ्या कृपेने
कच्चा अपूर्ण होतो तू जाळलेस तेव्हा

शिकलो जगावयाला अपसूक एकटा मी
झाले बरेच, नाही सांभाळलेस तेव्हा

समजावुनी मनाला 'तुष्की' सुखात होता
का तू वळून मागे न्याहाळलेस तेव्हा

तुषार जोशी, नागपूर 'तुष्की'
+९१ ९८२२२ २०३६५
२१ मार्च २०१२, १०:००

गुलमोहर: 

मस्त...............
शिकलो जगावयाला अपसूक एकटा मी
झाले बरेच, नाही सांभाळलेस तेव्हा>>>>>>>>> खूप आव्ड्ला

तुष्की

हे तखल्लूस नवेच

आम्ही ऐकलेले नाही इतके नावीन्यपूर्ण तखल्लूस

कवी तुषार, आम्ही गझलेबाबत नंतर लिहू

होतो प्रसिद्ध मोठा ओवाळलेस तेव्हा
कीर्ती विरून गेली तू टाळलेस तेव्हा
वा वा वा!!
क्या ब्ब्बात है!!!

शिकलो जगावयाला अपसूक एकटा मी
झाले बरेच, नाही सांभाळलेस तेव्हा
हा ही आवडला..
Happy

होतो प्रसिद्ध मोठा ओवाळलेस तेव्हा
कीर्ती विरून गेली तू टाळलेस तेव्हा>> खास!

प्रीती तुझी हवीशी सर्वात जास्त होती
वाटेत चालताना तू गाळलेस तेव्हा>> थेट, खूप आवडला!!

शिकलो जगावयाला अपसूक एकटा मी
झाले बरेच, नाही सांभाळलेस तेव्हा>> Happy आवडलाच!

समजावुनी मनाला 'तुष्की' सुखात होता
का तू वळून मागे न्याहाळलेस तेव्हा>> वाह वा! Happy

तुषार,
तावून आज झालो सोने तुझ्या कृपेने
कच्चा अपूर्ण होतो तू जाळलेस तेव्हा

शिकलो जगावयाला अपसूक एकटा मी
झाले बरेच, नाही सांभाळलेस तेव्हा

समजावुनी मनाला 'तुष्की' सुखात होता
का तू वळून मागे न्याहाळलेस तेव्हा

--- मस्त यार! छान लिहतोस.
-- जयन्ता५२