नवीन वर्षाची सुरुवात छानस्या ट्रीपने करावी असा विचार आला असतानाच सौरभच्या देवबाग ट्रीपचे फोटो पाहायला मिळाले. तारकर्लीजवळच्या या ठिकाणाबद्द्ल ऐकलच होतं. त्यामुळे देवबागलाच जायचं ठरलं. गजालीच्या धाग्यावर माहिती मागितल्यावर विवेक देसाई आणि यो-रॉक्स आणि मस्त माहिती आणि संपर्क दिले.
जानेवारी च्या पहिल्याच विकांताला दौरा करायचा ठरलं.
'कोकणमय'
=======================================================================
=======================================================================
कोकणमय या मालिकेतील हा पहिला भाग
या भागाची सुरुवात करण्याआधी कोकण फिरण्यास/जाणुन घेण्यास मायबोलीकर नीलू, भाऊकाका नमसकर, अतुलनिय, विवेक देसाई, नीलवेद, यो रॉक्स, साधना यांनी मोलाची मदत केली. आभार परक्यांचे मानायचे असतात म्हणुन त्यांचे आभार मी मानणार नाही. खरंतर याचा उल्लेख प्रस्तावनेच्या धाग्यात यायला हवा होता, पण राहुन गेलं. 