माझ्झंच स्केचबुक एकदम भारी....

माझ्झंच स्केचबुक एकदम भारी...

Submitted by पुरंदरे शशांक on 13 February, 2012 - 01:20

माझ्झंच स्केचबुक एकदम भारी
छान छान चित्रं काढलीत कितीतरी

लाल निळा हिरवा केवढे ते रंग
रंगवताना स्केचबुकमधे होते मी गुंग

यात सारखं बघून हस्तोस का असा
स्टुपिडेस का तू, तुझा स्क्रू ढिलासा

एवढा का माझा हत्ती झालाय हडकुळा ??
फुल कस्लं तुझे.... दिस्तोय खुळखुळा.....

कित्ती कित्ती काढायचेत फुले नी प्राणी
तुला काय चिडवायला मिळाले नाही कुणी ??

नसू दे माझा फुगा गोल जराही.....
तू त्याला चिडवायचे कारणच नाही.......

हसू नको काही या चिमणीला बघून
असेल मोठी झाडापेक्षा..... तू निघ आधी इथून....

गुलमोहर: 
Subscribe to RSS - माझ्झंच स्केचबुक एकदम भारी....