Submitted by पुरंदरे शशांक on 13 February, 2012 - 01:20
माझ्झंच स्केचबुक एकदम भारी
छान छान चित्रं काढलीत कितीतरी
लाल निळा हिरवा केवढे ते रंग
रंगवताना स्केचबुकमधे होते मी गुंग
यात सारखं बघून हस्तोस का असा
स्टुपिडेस का तू, तुझा स्क्रू ढिलासा
एवढा का माझा हत्ती झालाय हडकुळा ??
फुल कस्लं तुझे.... दिस्तोय खुळखुळा.....
कित्ती कित्ती काढायचेत फुले नी प्राणी
तुला काय चिडवायला मिळाले नाही कुणी ??
नसू दे माझा फुगा गोल जराही.....
तू त्याला चिडवायचे कारणच नाही.......
हसू नको काही या चिमणीला बघून
असेल मोठी झाडापेक्षा..... तू निघ आधी इथून....
मला बाई आवडतं माझ्झंच स्केचबुक
नसेल आवडत कोणाला तर लग्गेच फूट.......
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
सुंदरच.
सुंदरच.
हसू नको काही या चिमणीला
हसू नको काही या चिमणीला बघून
असेल मोठी झाडापेक्षा..... तू निघ आधी इथून.... >>> लहानपणी बरेचदा असे व्हायचे आणि चित्राचे हसे व्हायचे. छान जमलय स्केचबुक एकदम भारीच
मस्तंय
मस्तंय
मनापासून धन्यवाद..........
मनापासून धन्यवाद..........
मस्त
मस्त
कसली गोड कविता आहे. प्रचंड
कसली गोड कविता आहे. प्रचंड आवडली मला.