"मी मराठी.."
लहानपणी आपण कितीतरी नवे नवे खेळ शोधून काढत असतो, सुट्ट्यांचा वेळ मस्त मजेत घालवत असतो. मोठं होताना या खेळांचं बोट कधी सुटतं ते कळतही नाही आणि मग ते आपल्या बालपणीच्या, गावाला, भावंडांसोबत घालवलेल्या सुट्ट्यांच्या आठवणींचे फुलपंखी रंग बनून राहतात. मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा त्या अल्लड वयात जाऊन ती मजा पुन्हा लुटता येते का पाहणार आहोत. आपण सर्वांनी आयुष्यात हमखास एकदा तरी खेळलेला खेळ म्हणजे - नाव गाव फळ फूल!! खेळूया पुन्हा एकदा? आम्ही एक अक्षर देणार आणि त्यावरुन तुम्ही पटापट लिहून काढायचंय -
१. मराठी नाव
२. महाराष्ट्रातील गाव

आपली बोलीभाषा दर बारा कोसांवर बदलते आणि या प्रत्येक बोलीभाषेची काही वैशिष्ट्ये आहेत. प्रत्येकीचा आपापला असा गोडवा, ठाशीवपणा, तिखटपणा, लहेजा आहे. मायबोली वर साजर्या होत असलेल्या 'मराठी भाषा दिवस २०१२' च्या निमित्ताने आपण अनुभवणार आहोत बोलीभाषेचा ठसका.
चला तर मग, तयारी करा आपापल्या मनाच्या कप्प्यात हळुवारपणे जपलेल्या बोलीभाषेला मिरवण्याची!
आपापल्या भाषेतली ही गंमत आपण अशी अनुभवणार आहोत-

मराठी भाषा दिवस २०१२ निमित्ताने थोडे मुद्द्याचे बोलुया?
इथे खाली दिलेल्या मुद्द्यांवर लिहिणे अपेक्षित आहे.
- आपल्या मुलांना मराठी बोलता, लिहिता, वाचता येते का? येत असेल तर कितपत येते? मुलं इतर मराठी मुलांशी मराठीत बोलतात का?
- तुमची मुलं इंग्रजी माध्यमातून शिकत असतील तर तुम्ही मुलांना मराठी भाषा कशा प्रकारे शिकवता? त्यासाठी काय प्रयत्न करता? तुमची मुलं मराठी माध्यमातून शिकत असतील तर तो अनुभवही जरुर लिहा.

आपलं बालपण समृद्ध करणारा आपल्या भाषेचा पिढीजात वारसा, आपल्या मातीशी तिथल्या निसर्गाशी, माणसांशी आपलं नातं जोडणार्या छोट्या छोट्या गोष्टी. नव्या पुस्तकांचा हट्ट धरायला लावणार्या, त्यांच्या सुवासासारख्या दरवळत राहणार्या, आयुष्यभर साथ करणार्या रंजक गोष्टी. आजीआजोबांच्या मायेची ऊब देणार्या गोड गोष्टी. मुलांचं आकलन वाढतं तशा स्वरचित गोष्टींनाही बहर येतो. त्या तर भन्नाट !
१. नेहमीच्या गंमतगोष्टी
नियमावली