आपलं बालपण समृद्ध करणारा आपल्या भाषेचा पिढीजात वारसा, आपल्या मातीशी तिथल्या निसर्गाशी, माणसांशी आपलं नातं जोडणार्या छोट्या छोट्या गोष्टी. नव्या पुस्तकांचा हट्ट धरायला लावणार्या, त्यांच्या सुवासासारख्या दरवळत राहणार्या, आयुष्यभर साथ करणार्या रंजक गोष्टी. आजीआजोबांच्या मायेची ऊब देणार्या गोड गोष्टी. मुलांचं आकलन वाढतं तशा स्वरचित गोष्टींनाही बहर येतो. त्या तर भन्नाट !
१. नेहमीच्या गंमतगोष्टी
नियमावली
१) मराठी भाषेत मुलांनी सांगितलेली कुठलीही गोष्ट चालेल. (पारंपरिक, स्वरचित, वाचलेली, ऐकलेली, अनुवादित कुठलीही गोष्ट चालेल)
२) सादरीकरणाचा कालावधी: १- ३ मिनिटे
३) पालकांनी पाल्याचे गोष्ट सांगतानाचे ध्वनिमुद्रण/ ध्वनिचित्रमुद्रण करुन पाठवायचे आहे. पाठवताना आपला मायबोली आयडी, पाल्याचे नाव आणि वय नमूद करावे.
४) ध्वनिमुद्रण असल्यास audio file sanyojak@maayboli.com इथे पाठवावी
५) ध्वनिचित्रमुद्रण असल्यास youtube.com इथे फाईल upload करुन त्याचा दुवा sanyojak@maayboli.com इथे पाठवावा
६) अंतिम तारीख: २६ फेब्रुवारी २०१२
७) वयोगट: २-१२ वर्षे
२. चित्रसंचावर आधारित स्वरचित गोष्टी
खालीलपैकी कुठल्याही एका चित्रसंचावर आधारित स्वरचित गोष्ट सांगायची अथवा लिहायची आहे.
चित्रसंच १
साधूबुवा, यज्ञ, राजा, लांबनाक्या टोमॅटो, सैनिक
चित्रसंच २
दोन मित्रं, धबधबा, ससुला, शेतातील घर
चित्रसंच ३
मुलगा, ढग, सायकल (दुचाकी), जंगलातला रस्ता
चित्रसंच ४
विमान, धावपट्टी, मोठ्ठा फुगा, बर्फातील घर
नियमावली
१) वरीलपैकी एका संचातील चित्रांना एकत्र गुंफून मराठी भाषेत मुलांनी सांगितलेली अथवा लिहून पाठवलेली स्वरचित गोष्ट चालेल. छोट्या दोस्तांनी त्यात आपल्या मनाने अजून चित्रं काढली तरी चालणार आहे. असे करताना दिलेल्या दुसर्या किंवा तिसर्या संचातील चित्रं त्यात वापरायची नाही. कळलं ना?
२) अंतिम तारीख: २६ फेब्रुवारी २०१२
३) पालकांनी पाल्याचे गोष्ट सांगतानाचे ध्वनिमुद्रण/ ध्वनिचित्रमुद्रण करुन पाठवायचे आहे. पाठवताना आपले नाव आणि मायबोली आयडी, पाल्याचे नाव आणि वय नमूद करावे.
ध्वनिमुद्रण असल्यास audio file sanyojak@maayboli.com इथे पाठवावी
ध्वनिचित्रमुद्रण असल्यास youtube.com इथे फाईल upload करुन त्याचा दुवा sanyojak@maayboli.com इथे पाठवावा.
अथवा
३अ) पाल्याने वरीलपैकी एका चित्रसंचावर गोष्ट रचून स्वतःच्या हस्ताक्षरात लिहीली असता, स्कॅन करुन पालक पाठवू शकतात. पाठवताना आपला मायबोली आयडी, पाल्याचे नाव आणि वय नमूद करावे.
पाल्याच्या हस्ताक्षरातील गोष्ट स्कॅन करुन sanyojak@maayboli.com इथे पाठवावी
अथवा
४) वयोगट: ३-१४ वर्षे
५) सादरीकरणाचा कालावधी: १- ३ मिनिटे
आपल्या काही शंका असतील लहान मुलांच्या कार्यक्रमाबाबत तर त्या इथे जरुर विचाराव्यात!
२ वेगवेगळे वयोगट आहेत का ? २
२ वेगवेगळे वयोगट आहेत का ?
२ ते १२ आणि ३ ते १४ ? २ ते १२ मधे कोणतीही गोष्ट चालेल असं का (अर्थात मराठीत पण चित्रांवर आधारीत नाही असं ? )
होय. पहिल्या प्रकारात
होय. पहिल्या प्रकारात 'कोणतीही गोष्ट' चालणार आहे. आणि दुसर्या प्रकारात दिलेल्या चित्रांवरुन गोष्ट मुलांनी स्वतः तयार करायची आहे.
भारी आमच्याकडे काय होईल का
भारी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आमच्याकडे काय होईल का बघते.
कल्पना तिच्या डोक्यात घातली
कल्पना तिच्या डोक्यात घातली आहे. कोशिश.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
संयोजक मंडळ, शिर्षकातलं
संयोजक मंडळ, शिर्षकातलं 'मुलांसाठीचे' उपक्रम कानाला ऐकायला अशुद्ध वाटतंय ( माझ्या मते). त्या ऐवजी मुलांकरता किंवा मुलांसाठी असं करता येईल का?
चित्रसंच ४ व्यतिरिक्त बाकी
धन्यवाद.
धन्यवाद.
मस्तच आहेत स्पर्धा. लेकीला
मस्तच आहेत स्पर्धा. लेकीला लाडीगोडी लावायला लागेल. बघते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त कल्पना.......बघु चिंरजीव
मस्त कल्पना.......बघु चिंरजीव दिवे लावण्याच्या मनस्थिती बनवतात का????? प्रयत्न करायला काहीच हरकत नाही.........![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त एक शंका - "चित्रसंचावर
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एक शंका -
"चित्रसंचावर आधारित स्वरचित गोष्टी" मधे नुसता चित्रसंचाचा क्रमांक लिहिणं अपेक्षित आहे की ती चित्र परत काढणं पण? का आपल्या मनानी अजुन चित्र काढली असतील तर तेवढीच चित्र गोष्टी बरोबर स्कॅन करायची?
किती जुना ऑडिओ चालेल?
किती जुना ऑडिओ चालेल?
मस्त कार्यक्रम! क्रमांक २
मस्त कार्यक्रम!
क्रमांक २ मध्ये चित्रांवरून पालकांनी गोष्ट रचली आणि ती मुलांनी सादर केलेली चालेल का? की मुलांनीच गोष्ट रचणं अपेक्षित आहे?
मस्त कार्यक्रम!
मस्त कार्यक्रम!
मस्त आहे कार्यक्रम.
मस्त आहे कार्यक्रम. पोस्टरवरची आणि उपक्रमाची चित्र एकदम क्यूट![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मंजिरी, नुसता चित्रसंचाचा
मंजिरी,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नुसता चित्रसंचाचा क्रमांक लिहिणं अपेक्षित आहे की ती चित्र परत काढणं पण>> नाही, तीच चित्रे पुन्हा काढणे अपेक्षित नाही. नुसता चित्रसंच कम्रांक लिहा.
आपल्या मनानी अजुन चित्र काढली असतील तर तेवढीच चित्र गोष्टी बरोबर स्कॅन करायची>>>> हो. बरोबर.
आश्चिग,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आत्ता त्या वयोगटात असणार्या मुलांसाठी कार्यक्रम आहे हा.
मंजूडी,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
की मुलांनीच गोष्ट रचणं अपेक्षित आहे? >>अगदी बरोबर.
खूपच क्यूट जाहिरात आहे
खूपच क्यूट जाहिरात आहे संयोजक.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त कार्यक्रम
मस्त कार्यक्रम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
संयोजक, या स्पर्धेसाठी लहान
संयोजक, या स्पर्धेसाठी लहान मूल हे माबोवरील सदस्याचे पाल्य असणे जरूरीचे आहे का?
माझा भाचा/भाची यात सहभागी झाले तर चालतील का?
मस्त स्पर्धा. बघू पोरगा तयार
मस्त स्पर्धा. बघू पोरगा तयार होतो का गोष्ट सांगायला.
प्रिंट काढली मुलाला दोखवतो.
प्रिंट काढली मुलाला दोखवतो.
टोकूरिका, तुम्ही पाल्याच्या
टोकूरिका,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुम्ही पाल्याच्या आईकिंवावडलांना कृपया मायबोली सदस्यत्व घेऊन या कार्यक्रमासाठी प्रवेशिका पाठवायला सांगाल का? त्यांना सदस्यत्व घेण्यासाठी २ मिनीटे लागतील फक्त.
तेही मायबोलीकर होतील.
जाहिरात क्यूट क्यूट! चित्रं
जाहिरात क्यूट क्यूट! चित्रं तर फार गोड... मलाच आता या उपक्रमात भाग घ्यावासा वाटतोय
अरेरे, उगाच वाढलं वय हे!! ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मस्त उपक्रम! लेकीला सांगते!
मस्त उपक्रम! लेकीला सांगते!
जाहिराती क्युट आहेत संयोजक
जाहिराती क्युट आहेत संयोजक
उपक्रम पण उत्तम.
मला पण भाग घ्यायचा आहे, मी
मला पण भाग घ्यायचा आहे, मी गोष्ट माझ्या आय डी वरुन पाठवू की आईच्या ???
अनन्या, तू तुझ्या आयडीवरून
अनन्या, तू तुझ्या आयडीवरून पाठवू शकतेस.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
क्रमांक २ -- गोष्ट मुलाने
क्रमांक २ -- गोष्ट मुलाने (स्वतः ) ईंग्लीशमधे लिहुन त्याचे मराठीत भाषांतर करुन सादर केली तर चालेल का? मराठीत गोष्ट रचणे अवघड जाईल.
सोनपरी, सादरीकरण मराठीतून हवे
सोनपरी, सादरीकरण मराठीतून हवे एवढीच अट आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मुलांनी सांगायच्या किंवा मुलांनी लिहीलेल्या गोष्टी त्यांच्या हस्ताक्षराच्या स्कॅन कॉपीज अथवा टंकित केलेले लेखन असेल तरी ते फक्त मराठीतूनच हवे.
दोन्ही स्पर्धांत भाग घेतला तर
दोन्ही स्पर्धांत भाग घेतला तर चालेल, की एक पाल्य एकाच स्पर्धेत प्रवेशिका देऊ शकतो?
संयोजक महाशय, काही कारणाने
संयोजक महाशय,
काही कारणाने त्या मुलाचे/मुलीचे पालक माबोचे सदस्यत्व घेऊ शकत नाहीत.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
Pages