"मी मराठी.."
लहानपणी आपण कितीतरी नवे नवे खेळ शोधून काढत असतो, सुट्ट्यांचा वेळ मस्त मजेत घालवत असतो. मोठं होताना या खेळांचं बोट कधी सुटतं ते कळतही नाही आणि मग ते आपल्या बालपणीच्या, गावाला, भावंडांसोबत घालवलेल्या सुट्ट्यांच्या आठवणींचे फुलपंखी रंग बनून राहतात. मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा त्या अल्लड वयात जाऊन ती मजा पुन्हा लुटता येते का पाहणार आहोत. आपण सर्वांनी आयुष्यात हमखास एकदा तरी खेळलेला खेळ म्हणजे - नाव गाव फळ फूल!! खेळूया पुन्हा एकदा? आम्ही एक अक्षर देणार आणि त्यावरुन तुम्ही पटापट लिहून काढायचंय -
१. मराठी नाव
२. महाराष्ट्रातील गाव
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
४. मराठी पुस्तकाचे नाव
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त)
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.)
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव (जो महाराष्ट्रीय म्हणून बाहेर ओळखला जातो. प वरुन पास्ता ऐवजी पुरणपोळी.)
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे
१३. मायबोली आयडी (मायबोलीकराचे नाव चालणार नाही, दिलेल्या अक्षरावरुन सुरु होणारा संपूर्ण चिन्हांसकट आयडी.)
आता सारे चतुर मायबोलीकर लक्षात घेऊन या खेळाचे नियम किंचित कडक केलेत बरं! काय आहेत हे नियम?
१. अक्षर दिल्यानंतर पूर्ण १३ उत्तरे लिहिल्यानंतरच पोस्ट टाकायची आहे. अर्धवट पोस्ट केल्यास, तुम्ही इतरांना मदत करता आहात हे गृहित धरुन फाऊल धरण्यात येईल व ते अक्षरच बाद करण्यात येईल. तेव्हा इतर प्रयत्न करणार्या मायबोलीकरांचा वेळ वाया जाऊ देऊ नका.
२. एकदा एका अक्षरावर पूर्ण १३ उत्तरांचे पोस्ट पडले की इतरांनी पुढील अक्षराची वाट पहावी. पहिल्या पूर्ण १३ उत्तरांच्या पोस्टीस महत्त्व आहे हे लक्षात घ्या. पुढच्या पोस्टी ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. त्वरीत उत्तरांना महत्त्व आहे.
३. ठराविक वेळाने संयोजक पुढचे अक्षर देत राहतील. हा खेळ सर्व मायबोलीकरांना खेळता यावा याची काळजी घेतली जाईल.
४. जास्तीत जास्त अक्षरांसाठी सर्वात आधी १३ प्रश्न पूर्ण करणार्यांस बक्षिस.
५. अट फक्त एकच, प्रत्येक उत्तर 'मराठी'तच पाहिजे.
आम्ही इथे एक अक्षर उदाहरणादाखल दिले आहे.
१. मराठी नाव - परिमल
२. महाराष्ट्रातील गाव - पुणे
३. मराठी कलाकाराचे नाव -पुष्कर श्रोत्री
४. मराठी पुस्तकाचे नाव - पांगिरा
५. मराठी लेखक/लेखिका - पु. ल. देशपांडे
६. मराठी कवी/कवयित्री - शिरीष पै
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - पाऊले चालती पंढरीची वाट
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - पदरी पडले पवित्र झाले
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - पिंजरा
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- पुरणपोळी
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - पोपट
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - पुरंदरचा किल्ला
१३. मायबोली आयडी - पीहू
**** महत्त्वाची घोषणा ****
लोकहो:
आपण सर्वांनी ह्या खेळाला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद! खेळाची रंजकता थोडी अजून वाढवण्यासाठी आम्ही ह्यात अजून ४ गोष्टी समाविष्ट केल्या आहेत. तर आता नवीन प्रश्नावली आहे अशी:
१. मराठी नाव
२. महाराष्ट्रातील गाव
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
४. मराठी पुस्तकाचे नाव
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त)
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.)
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव (जो महाराष्ट्रीय म्हणून बाहेर ओळखला जातो. प वरुन पास्ता ऐवजी पुरणपोळी.)
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे
१३. मायबोली आयडी (मायबोलीकराचे नाव चालणार नाही, दिलेल्या अक्षरावरुन सुरु होणारा संपूर्ण चिन्हांसकट आयडी.)
१४. महाराष्ट्रातील नदीचे नाव
१५. झाडाचे / वनस्पतीचे मराठी नाव
१६. मराठी अलंकाराचे नाव
१७. महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्राचे/देवस्थानाचे नाव
आणि आता अक्षर आहे:
अनघा आळंदी अशोक
अनघा
आळंदी
अशोक सराफ
अघळपघळ
आशा बगे
अनंतफंदी
असा बेभान हा वारा
अगं अगं म्हशी
अशीही बनवाबनवी
अळूचे फदफदे
अस्वल
अर्नाळा
अंजली
मराठी नाव - अनय २.
मराठी नाव - अनय
२. महाराष्ट्रातील गाव - सिंडीचे गाव अहमद नगर
३. मराठी कलाकाराचे नाव : अभिजीत सावंत
४. मराठी पुस्तकाचे नाव अपूर्वाई
५. मराठी लेखक/लेखिका - अनिल अवचट
६. मराठी कवी/कवयित्री - अनिल
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - अखेरचा हा तुला दंडवत
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - अलिकडे आड पलिकडे विहीर . / इकडे आड तिकडे विहीर
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - अखेरचा सवाल
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- अनरसा
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - अज
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - अजिंक्यतारा
१३. मायबोली आयडी - अल्पना
ती म्हण इकडे आड तिकडे विहिर
ती म्हण इकडे आड तिकडे विहिर अशी आहे ना? मी आजवर अशीच ऐकली आहे
१. मराठी नाव - अश्विनी २.
१. मराठी नाव - अश्विनी
२. महाराष्ट्रातील गाव - अकोला
३. मराठी कलाकाराचे नाव - अविनाश नारकर
४. मराठी पुस्तकाचे नाव - अजबखाना
५. मराठी लेखक/लेखिका - आशा बगे
६. मराठी कवी/कवयित्री - अरुण कोलटकर
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - अजून नाही जागी राधा
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - अशी पाखरे येती
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- आंबावडी
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - अजगर
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - अर्नाळा
१३. मायबोली आयडी - अरभाट
ओह! एक पूर्ण उत्तर आलं की थांबायचं होय! जौद्या झालं!
२. महाराष्ट्रातील गाव -
२. महाराष्ट्रातील गाव - अकोला
omg.. .मी किती नाचू किती गाऊ असे झाले आहे मला
धन्यवाद स्वाती
हह, संपूर्ण म्हण लिहिणे
हह, संपूर्ण म्हण लिहिणे अपेक्षित असल्याने आपली एंट्री बाद होत आहे.
मेधा, "अलिकडे आड पलिकडे विहीर" अशी म्हण नसून "इकडे आड तिकडे विहीर" अशी असल्याने आपली एंट्री बाद होत आहे.
हुर्रे!
हुर्रे!
१. मराठी नाव - अमृता २.
१. मराठी नाव - अमृता
२. महाराष्ट्रातील गाव - अमरावती
३. मराठी कलाकाराचे नाव - अश्विनी भिडे-देशपांडे
४. मराठी पुस्तकाचे नाव - आयदान
५. मराठी लेखक/लेखिका - अनिल अवचट
६. मराठी कवी/कवयित्री - अमरशेख
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - आज कुणीतरी यावे
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - आयजीच्या जिवावर बायजी उदार
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - अखेरचा सवाल
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- आमटी
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - अजगर
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - अलंग
१३. मायबोली आयडी - अदिती
स्वाती_आंबोळे, अभिनंदन! आपण
स्वाती_आंबोळे, अभिनंदन! आपण सगळी उत्तरे अचूक पूर्ण केली आहेत.
आयजीच्या जिवावर बायजी उदार >>
आयजीच्या जिवावर बायजी उदार
>> सही म्हण.. काय बाज असतो म्हणींमधील शब्दाचा. अहाहा!!! धन्य अजुक्के
आँ? या खेळाला डेरी मिल्क नाही
आँ? या खेळाला डेरी मिल्क नाही का?
या खेळात जास्तीत जास्त
या खेळात जास्तीत जास्त अक्षरांसाठी १३ उत्तरे पूर्ण केल्यास मायबोली तर्फे खास बक्षिस आहे.
वरच्या दोन्ही उत्तरांपैकी एकही शब्द कॉपी न केल्यामुळे आणि १३ ही उत्तरे अचूक आणि पूर्ण असल्याने स्वाती_आंबोळे यांची पोस्ट ग्राह्य धरली गेली आहे.
डेअरी मिल्क पण द्या ओ संयोजक!
डेअरी मिल्क पण द्या ओ संयोजक!
फारच कडक नियम लावताय हं
फारच कडक नियम लावताय हं संयोजक. तुम्ही पण पूर्ण म्हण पाहीजे हा नियम पूर्ण लिहिलेला नाही
पण याला काहीच अर्थ नाही
पण याला काहीच अर्थ नाही संयोजक. तुम्ही रात्री चालू केलीत स्पर्धा. उद्या सकाळी जे येतील ते कुणीच पहिले असू शकणार नाहीत ना.
धन्यवाद, संयोजक. नीधप, आणि
धन्यवाद, संयोजक.
नीधप, आणि उद्या तुमच्या दिवसभरात जास्त अक्षरं दिली गेली तर?
आमची दुपार उलटली की आता!
म्हणजे थोडक्यात कुठल्यातरी
म्हणजे थोडक्यात कुठल्यातरी टाइमझोनला झुकतं माप कुठल्यातरी टाइमझोनवर अन्याय नाही का?
नीरजा, प्रत्येक अक्षर
नीरजा, प्रत्येक अक्षर दिल्यानंतर जे पहिले पोस्ट १३ पूर्ण अचूक उत्तरांचे असेल ते. अशा जास्तीत जास्त अक्षरांवर उत्तरे देणारे. अक्षरे समान विभागली आहेत. तुम्ही फक्त खेळा.
हो. त्यामुळे मी या
हो. त्यामुळे मी या डेअरीमिल्कवरच समाधान मानते झालं.
१. मराठी नाव -आश्लेषा २.
१. मराठी नाव -आश्लेषा
२. महाराष्ट्रातील गाव - अक्कलकोट
३. मराठी कलाकाराचे नाव - अमृता सुभाष
४. मराठी पुस्तकाचे नाव - अलीकडे पलीकडे
५. मराठी लेखक/लेखिका - अरुण शेवते
६. मराठी कवी/कवयित्री - अंजली कुलकर्णी
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - असा बेभान हा वारा
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - अंथरूण पाहून पाय पसरावेत.
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - आघात
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- अळुची वडी
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - अश्व.
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - आजोबागड
१३. मायबोली आयडी - आशूडी |
जशी नवीन उत्तरे येतील तशी मजा वाढत जाणार
संयोजकांनी माझा आय डी उदा. म्हणुन वापरण्याचे प्रताधिकार घेतल्याबद्दल धन्यवाद
पीहू, प्राण्याचे मराठी नाव
पीहू, प्राण्याचे मराठी नाव घोडा ना ा?
अश्व पण आहे मराठी डीक्शनरी
अश्व पण आहे मराठी डीक्शनरी मधे
. मराठी नाव - भास्कर २.
. मराठी नाव - भास्कर
२. महाराष्ट्रातील गाव - भिलवडी
३. मराठी कलाकाराचे नाव -भास्कर चंदावरकर
४. मराठी पुस्तकाचे नाव - भुमी
५. मराठी लेखक/लेखिका - भा रा भागवत
६. मराठी कवी/कवयित्री - भा रा तांबे
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - भर उन्हात बसली धरून सावली गुरं
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - भटाला दिली ओसरी भट हात पाय पसरी
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - भुताचा भाऊ
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- भानोले
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - भारद्वाज पक्षी
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - भैरवगड
१३. मायबोली आयडी - भागवत
फक्त कवयित्री राहिली होती!
फक्त कवयित्री राहिली होती! सगळी मेहनत पाण्यात!! जरा जाऊन झोप की हवे! जरा नॉर्मल टायमाला जागे (आणि कामावर) असलेल्यांना चानस दे की जरा!
१. मराठी नाव - भरत २.
१. मराठी नाव - भरत
२. महाराष्ट्रातील गाव - भिवंडी
३. मराठी कलाकाराचे नाव - भारती आचरेकर
४. मराठी पुस्तकाचे नाव - भिन्न
५. मराठी लेखक/लेखिका - भालचंद्र नेमाडे
६. मराठी कवी/कवयित्री - भाऊसाहेब पाटणकर
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - भय इथले संपत नाही
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - भित्यापाठी ब्रम्हराक्षस
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - भुताचा भाऊ
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- भगर
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - भेकर
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - भैरवगड
१३. मायबोली आयडी - भान
बुवा पोस्ट करा. माझी एन्ट्री
बुवा पोस्ट करा. माझी एन्ट्री बाद करून संयोजक नवा नियम आणतील आणि तुम्ही जिंकाल
भेकर की भोकर ?
भेकर की भोकर ?
जाऊ दे. मला फक्त सुरेश भट
जाऊ दे. मला फक्त सुरेश भट माहित होते. ते पण फक्त आडनाव नसते चालले. असो, तुझी एंट्री बरोबर आहे, कॅडबरी मिलणार आहे तुला.
भेकरच मला वाटतं.
भेकर बरोबर आहे सिन्डी भोकर
भेकर बरोबर आहे सिन्डी भोकर म्हणजे फळ असते त्याचे लोणचे घालतात.
भेकराचेपण लोणचे करत असतील,
भेकराचेपण लोणचे करत असतील, काय सांगा?
Pages