दत्तगुरू

श्रीदत्त माऊली

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 5 February, 2013 - 13:33

कृपेची सावलीl l श्रीदत्त माऊली l
तयास वाहिली l काया माझी ll १ ll
संसारी शिणली l झिजली फाटली l
परी आदरली l तीच प्रेमे ll २ ll
प्रभु कृपा केली l प्रेमे स्वीकारली l
जीर्ण शीर्ण झाली l गाथा माझी ll ३ ll
रस हीन फळ l गंध हीन फूल l
जीवन सफल l झाले आज ll ४ ll
विक्रांत प्रभाकर
http://vikrantchishodhyatra.blogspot.in/

दत्त दत्त बोलत गेलो

Submitted by पाषाणभेद on 27 December, 2011 - 17:44

दत्त दत्त बोलत गेलो

दत्त दत्त बोलत गेलो
गेलो गेलो दत्त दत्त बोलत गेलो
दत्ताला भजूनी धन्य झालो
झालो झालो दत्ताला भजूनी धन्य झालो ||

दत्तनाम सदा राहे माझ्या मुखी
जगामधे मीच आहे सर्व सुखी
नकळे मला मी कोण होतो
दत्ता समोर प्रत्यक्ष शरण आलो ||

गुरूदत्तावरी माझा राही विश्वास
दत्त दत्त सदा घेई अंतरी श्वास
विस्मये आश्चर्ये असे दत्त किर्ती
वेळीअवेळी दत्ताला आठवित गेलो ||

गुलमोहर: 
Subscribe to RSS - दत्तगुरू