वाट सुटकेची पाहतो सुपरस्टार कालचा
कितीक वर्षं राहिलो चाहत्यांच्या गराड्यात
आज वेळ आलीय रहायची कोंबड्यांच्या खुराड्यात
काय सांगू तुम्हाला माझे डायलॊग्ज एके काळचे
सलीम-जावेद लिहायचे आणि फॆन्स खुळे व्हायचे
स्वत:च्या रक्तानं मुली पत्रं लिहायच्या यारों
बंगल्यासमोर माझ्या ताटकळायचे हजारो
निर्माते तर जीव टाकायचे एका ’हो’ साठी
दिग्दर्शक रेंगाळत माझ्या कुत्र्याच्या ’भो’ साठी
त्या काळात एकही हिरो माझ्यापुढं टिकला नाही
माझ्याहून अधिक किमतीला एकही सिनेमा विकला नाही
सुंदर सुंदर नट्या सतत इर्द-गिर्द नाचायच्या
ब्रेकमधे माझ्याच बातम्या स्टारडस्ट्मधे वाचायच्या
दुर्दैवाने लागोपाठ चार सिनेमे पडले
आजुबाजुचे पडेल हिरो दहा फूट ऊडले