'हा भारत माझा' - दिग्दर्शकांचं पत्र
प्रिय मित्रांनो,
म्हटलं तर गोष्ट तशी साधी आहे...
इंद्र सुखात्मेचा बारावीचा निकाल लागला आहे, आणि त्याला इंजीनियरिंगला प्रवेश घ्यायचा आहे.
लहानपणापासूनचं त्याचं स्वप्न होतं, आपण इंजीनियर व्हायचं. पण त्याच्या अण्णांना, म्हणजे वडिलांना वाटतंय, मुलांनी आपल्याला मोठ्या खर्चात घालण्यापेक्षा थोडी वेगळी वाट घेऊन समाधानी व्हावं.
इंद्रला मार्क पडलेत ९०%. पण अॅडमिशन थांबली आहे ९१ टक्क्यांवर!
आईचं म्हणणं इतकंच, की मुलांच्या सुखातच तिचं सुख आहे.
आमच्या ’हा भारत माझा’ या नव्या चित्रपटाची ही गोष्ट इतकी साधी आहे - तुमच्या आमच्या घरातली.