येणार येणार मतदार राजाचे दिवस येणार!
Submitted by प्रकाश घाटपांडे on 30 April, 2018 - 00:41
शहरात निवडणुकांचे वारे वाहायला सुरवात होईल.राजकीय पक्षांना लोकहिताचा कळवळा यायला ला्गेलहे. झालेल्या कामांचे श्रेय घेण्याची रस्सीखेच चालू होईल. न झालेल्या कामांचे अपश्रेय हे पालिका प्रशासन वा अन्य राजकीय पक्षांना ढकलायला सुरुवात होईल. झालेली कामे सातत्याने लोकांपुढे करत रहायच आणि न झालेल्या कामाविषयी चकार शब्द काढायचा नाही. जनसामान्याची स्मृतीत कुठलीही गोष्ट फार काळ टिकत नाही.नुकतीच घडलेली गोष्ट मात्र स्मृतीत राहते. ही नाडी सर्वच पक्षांना माहित आहे. पुण्यातल्या विकास कामात जनसामान्यांना फारसा रस नसतो.
शब्दखुणा: