माझे गाजलेले व़क्तृत्व....
Submitted by मी विडंबनकार on 12 October, 2011 - 02:11
"अहो सर, ह्याचं हिंदी खूप छान आहे. हिंदी फारच छान बोलतो" पांडे सरांनी पाटील सरांना आश्वासन दिले.
"खरंच ना? नाहीतर साहेबांपुढे धांदल उडायची" पाटील सरांच्या चेहर्यावर थोडा ताण होता.
वकृत्व स्पर्धेचं आयोजन शेवटी त्यांच्याच हातात होतं. "सर, ट्रस्ट मी " पांडे सरांच्या चेहर्यावर आत्मविश्वास होता.
"ठीक आहे , याचं नाव मी फायनल यादीत टाकतो , काय नाव म्हणालात याचं ? रोहित ना?" पाटिलजी उवाच!
पांडे सर तत्परतेने- "होय"
सरांचा आत्मविश्वास त्यांच्या आवाजातून जाणवला आणि मला माझी जबाबदारी कळाली. त्यावेळी सहावीत होतो मी.
गुलमोहर:
शेअर करा