मराठी भाषा दिवसानिमित्त पुलंबद्दल लिहायचं ठरवल्यावर किती लिहू आणि किती नको असं वाटायला लागलं. कितीही लिहिलं तरी ते कमीच पडेल. यातून मार्ग काढण्यासाठी विनोदी लेखनाच्या पलीकडे असलेले पुलं मला ज्यातून दिसले, त्या पुस्तकांबद्दल आणि कॅसेटबद्दल लिहायचं ठरवलं. अलूरकर म्युझिक हाऊसची ’ एक आनंदयात्रा कवितेची’ ही, पुलं-सुनीताबाईंनी केलेल्या बा. भ.
सुनीताबाई देशपांडे यांचे निधन होऊन आता दीडेक वर्ष होऊन गेले. पु.ल. हयात असताना आणि त्यानंतरही सुनीताबाईंबद्दल बरेच बरे-वाईट बोलले-लिहिले जात असे. बरे कमी, वाईटच जास्त. ’पु.लं च्या प्रतिभेमागची खरी शक्ती’ इथपासून ते ’पु.लंच्या दारातलं कुत्रं’ इथपर्यंत विविध विशेषणे सुनीताबाईंना लावली गेली. गंमत म्हणजे यातली बरीचशी त्यांच्या कानावरही गेलेली होती. पु.लंच्या एकूण बहुरुपी व्यक्तिमत्वापुढे सुनीताबाईंची प्रतिमा (आणि प्रतिभा) काळवंडलेली, झाकोळल्यासारखीच राहिली असे खूप लोकांचे –अगदी खुद्द – पुलंचेही मत होते. ’आहे मनोहर तरी..’ नंतर तर त्यात भरच पडली.