रिकामपणाचे उद्योग - २ सरप्राईज बॉक्स
Submitted by रचना. on 13 June, 2012 - 05:52
गुलमोहर:
शेअर करा
लाजो यांचे http://www.maayboli.com/node/25345 येथील उद्योग पाहिल्यावर काही DIY tutorials लिहावं असं मनात होतं. पण वेळेअभावी ते जमलं नाही. आता खरतर मुलांच्या सुट्ट्या संपत आल्या असतील. तरीही नंतर उपयोगी पडतील म्हणून ही मालिका परत चालू करते.
या सर्व कलाकृती साध्या रंगीत मातीने बनवल्या आहेत..बाहुल्या बनवताना आधी अल्युमिनिअम फोईल चा वापर करून एक छोटा आणि एक मोठा बॉल करून घेतला. छोटा डोके बनवण्यासाठी आणि मोठा बोडीसाठी..ते एकमेकांना जोडून घेतले आणि वरून रंगीत माती लाऊन कव्हर केले आहे..माती कमी वापरली गेल्यामुळे बाहुल्या वजनाने हलक्या बनल्या आहेत..