दिवाळी अंक २०११

दिवाळी अंक २०११

Submitted by भरत. on 1 November, 2011 - 01:41

हितगुज दिवाळी अंक २०११ वाचून झाला, आता बाकीच्या अंकांकडे मोहरा वळवुया Happy

ते शिंकले तरीही.....!

Submitted by अभय आर्वीकर on 26 October, 2011 - 23:32

ते शिंकले तरीही.....!

आकांत बेदखल का अमुचे जगात होते?
ते शिंकले तरीही चर्चा नभात होते

सोकावलाय येथे काळोख माजलेला
घनघोर रात्र कोठे, कोठे प्रभात होते

का लोळतात पायी सिंहासने तयांच्या?
अद्भुत नवल कसले, त्यांच्या कुळात होते?

आक्रोश शोषितांचे ना उग्र रूप घेते
आक्रंदणे तयांची घरट्यात आत होते

जुळली सतार नव्हती बेसूर जीवनाशी
कसली स्मशानयात्रा तालासुरात होते?

दारिद्र्य पोसताना, गरिबीस राखताना

गुलमोहर: 

हितगुज दिवाळी अंक २०११

Submitted by संपादक on 25 October, 2011 - 22:21

नमस्कार मायबोलीकर रसिकहो,

संपादक मंडळ २०११ तर्फे तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ही दिवाळी आणि येणारें नवीन वर्ष सुखसमृद्धी, भरभराट घेऊन येवो.

आजच्या दिवशी आपण सगळे ज्याची उत्सुकतेने वाट पाहत होतो, तो 'हितगुज दिवाळी अंक' आपल्यापुढे सहर्ष सादर करत आहोत,

हितगुज दिवाळी अंक - २०११

स्नेहांकित,
संपादक मंडळ,
हितगुज दिवाळी अंक - २०११.

जालरंग प्रकाशनाचा दिवाळी अंक, ’दीपज्योती २०११’ चे प्रकाशन झालेले आहे.

Submitted by प्रमोद देव on 21 October, 2011 - 02:37

नमस्कार मंडळी! आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने बनलेला, जालरंग प्रकाशनाचा दिवाळी अंक,
’दीपज्योती २०११’ चे प्रकाशन झालेले आहे असे आम्ही जाहीर करत आहोत...खालील दुव्यावर तो आपल्याला वाचता येईल.

http://deepjyoti2011.blogspot.com/p/blog-page_12.html

विषय: 

हितगुज दिवाळी अंक २०११ - घोषणा

Submitted by संपादक on 7 September, 2011 - 04:41

hda2011_newimage_ghoshana_firework.jpg

रसिकहो, सप्रेम नमस्कार!
प्रत्येक दीपावली सृजनाचा नवा प्रकाश, नवा आविष्कार घेऊन येते. म्हणूनच कवी गोविंदाग्रज म्हणतात . . .

ही जुनी दिवाळी नव्या दमाने आली।
ही नवी टवटवी जुन्या जगाच्या गाली।

गणेशोत्सव सरता सरता देशातील, तसेच जगभर विखुरलेल्या साहित्यरसिक मराठी सुजनांना दिवाळी अंकाचे वेध लागतात. आपल्या सुजाण, अभिरुचीसंपन्न मायबोली परिवारात "हितगुज दिवाळी अंकाचे" अनन्यसाधारण महत्व आहे.

विषय: 

दिवाळी अंक लेखन मालकीहक्क (Copyright)

Submitted by संपादक on 6 September, 2011 - 17:16

मालकीहक्काबद्दल सूचना व खुलासा:

हितगुज दिवाळी अंकाच्या वाढत्या लोकप्रियतेला लक्षात घेता आम्हाला दिवाळी अंकासाठी आपण पाठवत असलेल्या कुठल्याही प्रवेशिकेच्या मालकीहक्काविषयी ( Copyright information ) स्पष्टीकरण आपल्या संरक्षणासाठी देणे महत्त्वाचे वाटते. यासाठीचे नियम खालीलप्रमाणे असतीलः

विषय: 

हितगुज दिवाळी अंक २०११ - नियमावली

Submitted by संपादक on 6 September, 2011 - 17:04

१. दिवाळी अंकासाठी पाठवायचे साहित्य रविवार ९ ऑक्टोबर २०११ [पॅसिफिक (अमेरिका) प्रमाणवेळेनुसार रात्री बारापर्यंत] संपादक मंडळाकडे पोहोचले पाहिजे.

२. दिवाळी अंकासाठी स्वलिखित आणि संपूर्णपणे अप्रकाशित साहित्य पाठवावे. साहित्य सॉफ्ट-कॉपीस्वरूपात आणि देवनागरी लिपीमध्येच पाठवावे. देवनागरीत नसलेले साहित्य स्वीकारले जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

३. साहित्य पाठवताना शक्यतो व्याकरणाच्या आणि शुद्धलेखनाच्या नियमांत बसेल असे पहावे.

विषय: 

अस्तित्व दान केले - लोकमत दिवाळी अंक

Submitted by अभय आर्वीकर on 6 September, 2011 - 03:08

अस्तित्व दान केले - लोकमत दिवाळी अंक २०११

असणेच आज माझे, नसण्यासमान केले
माझ्याच सावलीने अस्तित्व दान केले

मस्तीत टाकलेल्या, एकाच पावलाने
पावित्र्य आज माझे, दोलायमान केले

हळवा नकोस होऊ, अश्रू मला म्हणाले
संतप्त हुंदक्यांनी, माझे निदान केले

चंचूप्रवेश ज्यांचा हळुवार पावलांनी
त्या शुभ्र कावळ्यांनी उद्ध्वस्त रान केले

वाचाळ वल्गनांना वैतागलो पुरेसा
कानास वेधणारे, रस्ते किमान केले

इवल्या जगात माझ्या, मी रांगतो अजूनी
निष्कपट भावनेला दैदिप्यमान केले

गुलमोहर: 

दिवाळी अंक २०११ स्वयंसेवक घोषणा

Submitted by रूनी पॉटर on 8 August, 2011 - 19:38

मायबोली दिवाळी अंक २०११ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी या धाग्यावर आपली नावे कळवा. अंकासाठी साधारण दोन-अडीच महीने आठवड्यातले काही तास इतका वेळ द्यावा लागेल.
दिवाळी अंकात काम करणार्‍या प्रत्येक सदस्याकडे घरी इंटरनेट सेवा असणे अत्यावश्यक आहे.
दिवाळी अंकासाठी वेगवेगळ्या प्रकारची मदत लागते, खालील पैकी कुठल्या विभागात आपल्याला काम करायला आवडेल ते कळवा.
१. दिवाळी अंक संपादन
२. दिवाळी अंक रेखाटन
३. दिवाळी अंक सजावट
४. दिवाळी अंक साचा (template - यासाठी दृपल मध्ये कामाचा अनुभव असेल तर प्राधान्य)
५. मुद्रितशोधन (शुद्धलेखन तपासणे)

Subscribe to RSS - दिवाळी अंक २०११