Submitted by अभय आर्वीकर on 26 October, 2011 - 23:32
ते शिंकले तरीही.....!
आकांत बेदखल का अमुचे जगात होते?
ते शिंकले तरीही चर्चा नभात होते
सोकावलाय येथे काळोख माजलेला
घनघोर रात्र कोठे, कोठे प्रभात होते
का लोळतात पायी सिंहासने तयांच्या?
अद्भुत नवल कसले, त्यांच्या कुळात होते?
आक्रोश शोषितांचे ना उग्र रूप घेते
आक्रंदणे तयांची घरट्यात आत होते
जुळली सतार नव्हती बेसूर जीवनाशी
कसली स्मशानयात्रा तालासुरात होते?
दारिद्र्य पोसताना, गरिबीस राखताना
वाट्यात तज्ज्ञ अभये का एकजात होते?
- गंगाधर मुटे
------------------------------------------------
पूर्वप्रकाशित गझल
मोगरा फ़ुलला
ई दीपावली अंक २०११
------------------------------------------------
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
आकांत बेदखल का अमुचे जगात
आकांत बेदखल का अमुचे जगात होते?
ते शिंकले तरीही चर्चा नभात होते....मतला आवडला
बाकी ठिकठाक..गझल
आकांत बेदखल का अमुचे जगात
आकांत बेदखल का अमुचे जगात होते?
ते शिंकले तरीही चर्चा नभात होते
Mute'Ji,
damdar suruwaat keleli gazal avadali !