"हायकू" हा एक प्राचीन असा जपानी काव्यप्रकार आहे. याची रचना तीन ओळी अन सतरा अक्षरात असते; या ओळी 5-7-5 अशा अक्षररचनेत शब्दबद्ध असतात.
एकमेकांशी निगडित पूरक पण विरोधाभास जाणवेल असा भिन्न विचारप्रवाह दर्शिवणाऱ्या अनुभवांमधून मी एक हायकू लिहिण्याचा प्रयत्न केलाय; तुम्हाला ही रचना आवडेल अशी मी आशा करतो. तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
सर्व रसिक वाचकांना आज गुढीपाडवा निमित्त माझ्या हार्दिक शुभेच्छा!
************************
दिवे लागणी
लख्ख प्रकाश परी
अंधार मनी
मध्य प्रहरी
उष्म आस उरी
गार लहरी
तुझ्या प्रतीक्षेत पावसात मी चिंब उभी ...
गालावरुन ओघळणारे पाणी
तू पावसाचे कसे समजलास ?? !!!!
एक नाजुक पक्षी
किती सहज उडतोय
आभाळ पाठीवर घेऊन .....
या नाजुक फुलांवर हे थेंब कसले ?
यांच्या कुशीत
कोण असेल रडले ......?!!
कविता क्षीरसागर
आता ते घर
वाट पहिल्या विन
उघडे दार.
तसे पाहता
या रस्त्यावर नच
कुणी कुणाचे .
नुरले प्रेम
तरीही व्यवहार
असे शाबूत .
समोर येते
दोन वेळचे धड
रोज जेवण .
थोडे छप्पर
गॅलरीत त्या एक
जाड चादर .
ठरल्या वेळी
पण द्यावा लागतो
पैका मोजून .
जो तो आपुल्या
जगात हरवून
प्रेमावाचून .
होता बहाणा
ते खोटे खेचणे नि
सुटणे गाठी.
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
१.
पाऊस धारा
पडती हाती गारा
ओंजळ रिती
२.
कुटील कावा
मनांत रंगवावा
देवळात मी
३.
नाच मोराचा
हैदोस पावसाचा
माझी समाधी
मंत्री तुपाशी
बळीराजा उपाशी
घोडे कागदी -
पाऊस धारा
वर्दळ सैरावैरा
छत्र्या उत्साही !
घास हातात
बाळ परदेशात
पाणी डोळ्यात ..
रात्र काळोखी
अंधार अनोळखी
दिवे चोरांचे !
अबोल पती
भांडकुदळ पत्नी
हैराण भांडी ..