"परदेशी पैसे कमवायला गेलेले लोक सडकून टीका करतात भारतावर, तरी इथे पुन्हा तडमडायला का येतसतील ?"
वैशाली बोलली.
वैशालीच्या प्रश्नावर राणि काहीतरी बोलणार पण उदय ने तिला थांबवले.
तो म्हणाला कि "हे वईशाली ! तुझा प्रश्न बरोबर आहे. मी आता उत्तर देनारच आहे"
( आता आपन अवतरनचिन्हे ताकू नकोया. कंटिन्युईटी जाते)
हे वैशाली
प्रदेशी भारतॉय म्हणजे नॉन व्हेजची लाईन असली कि नॉन व्हेज होनारे आणि व्हेज लाईन असली कि व्हेज हिनारी जमात होय.
ते कसे काय ?
वर्तमानपत्रात छोट्या जाहिरातींमध्ये एक ठळक अक्षरातील जाहिरात लक्ष वेधून घेते : वधू पाहिजे, वर सुशिक्षित/ उच्चशिक्षित, परदेशात कायमचे वास्तव्य / ग्रीन कार्ड, स्वतःचे घर, गाडी इत्यादी इत्यादी, कोणतीही जबाबदारी नाही.... वधूबद्दल अपेक्षा....
आणि मग एवढ्या माहितीच्या आधारे अनेक वधुपिते त्या स्थळाच्या मागे लागतात. भराभर सोयीच्या तारखांना भेटीगाठी ठरविल्या जातात, चट मंगनी पट ब्याह होतो, नवरा-नवरी परदेशी त्यांच्या घरी रवाना होतात, किंवा नवरा अगोदर जातो - नवरी काही कालाने व्हिसा वगैरे औपचारिकता पूर्ण करून मग जाते. सारे काही आलबेल होते. पण ते तसे खरेच होते का?