काल एका मुलाने प्रश्न विचारला की जर नशिबात जे लिहिलेलं आहे ते होणारच असेल , न टळणारं असेल तर मग फलज्योतिष कशासाठी आहे? फक्त पुढे काय होणार हे सांगण्यासाठी ? बरं समजा पुढे जाऊन काय होणार आहे हे सांगितलं आणि ते आपण बदलू शकणार नाही आहोत किंवा आपली तेवढी कुवत नसेल किंवा ते अटळ असेल तर मग ज्योतिष्याने दिलेल्या या माहितीचा उपयोग काय ? नशिबात जे नकोसं लिहिलेलं आहे त्याला विरोध करण्याची मानवी क्षमता किती ?
फलज्योतिषाचा उपयोग हा त्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल आणि रुपाबद्दल अंदाज करणे, त्या व्यक्तीचा उपजीविकेचा प्रांत अंदाजे कोणता असेल? त्याला कोणता दखल घेण्याजोगा आजार/विकार आहे का याचा अंदाज करणे, आयुष्याचा जोडीदार म्हणून योग्य ठरेल का याबद्दल अंदाज करणे, जातकाचा प्रेमविवाह होईल का? तसेच जातकाच्या आयुष्यातला मानसिक संतुलन बिघडवणारा कालावधी ओळखणे, त्या व्यक्तीची एखादी इच्छा पूर्ण होईल की नाही आणि कधी होईल अशा कामांसाठी केला जातो.
फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी कशी असावी? तसेच कशी नसावी? यावर लोकांच्या संकल्पना / सुचना हव्या आहेत. फलज्योतिषावर आपले मत काय? हे अजमावण्याचा प्रयत्न हा नेहमीच असतो. यात फलज्योतिषाची उपयुक्तता हा मुद्दा तुर्तास बाजुला ठेवला आहे.कारण तो चाचणीशी संबंधीत नाही. तो स्वतंत्र विषय आहे. चाचणीचे वेगळे 'डिझाईन ' जर कुणाकडे असेल तर त्याचा विचार व्हावा हा यामागील हेतु. एखाद्याला चाचणी ऐवजी आव्हानप्रक्रिया याबाबत काही सुचवायचे असेल तर तेही अवांतर मांडावे. कारण आमच्यासाठी ते समांतरच असणार आहे. फलज्योतिष कसे अशास्त्रीय वा शास्त्रीय आहे हे सिद्ध करण्यासाठी हा धागा नाही. .