नवीन घेतलेल्या घराचे पीएमसी मधे पहिल्या ओनर चे नाव काढून आपले नाव घालणेचे आहे. ह्याकरिता एजंटचे नाव सुचवले गेलेले आहे. परंतु सग्ळेच फार महाग वाटते व तेही केल्यास, भ्रष्टाचारामधे आपण सहभागी होउ अशी भिती वाटते. कोणी हे काम आपले आपण केले आहे का? ऑनलाईन फॉर्म मी शोधला पण सापडला नाही. कोणी ह्यासंदर्भात अधिक माहीती पुरवु शकेल का?
रिडेव्हलपमेंट अर्थात पुनर्विकास! पण हा पुनर्विकास माझ्या घराचा नाही. माझी आई ठाण्याच्या वर्तक नगरला ज्या इमारतीमधे रहाते त्या इमारतीच्या पुनर्विकास प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. ती इमारत आता नाहीशी होऊन त्याजागी २२ मजल्यांची टोलेजंग इमारत उभी रहाणार आहे म्हटल्यावर आधी मनात प्रचंड निराशा दाटून आली. निर्जिव भिंतींमधूनसुद्धा जाणवारा मायेचा तो स्पर्श आता अवघी दोन एक वर्षेच सोबत रहाणार होता. पण नंतर आनंदही वाटला की आईला, भावाला रहाण्याकरिता एक नवीन छानसं घर, आहे त्याच जागी, विशेष कष्ट न करता मिळणार आहे.