जिवंतपण

नक्की काय होते!

Submitted by नीधप on 20 April, 2011 - 01:08

माझी जुनीच कविता. 'आतल्यासहित माणूस' या प्रयोगातलीच.
--------------------------------------------

नि:शब्दाचे आभाळ
तुला मला व्यापून रहाते.
नक्की काय होते?

निराकार अथांग
सगळे वेढून घेते
नक्की काय होते?

काही उमटत नाही,
निश्चल हालचाल फक्त उरते.
नक्की काय होते?

काहीच घडत नाही,
निराश व्यापक उरी भरून येते.
नक्की काय होते?

आसू नाही, हासू नाही,
डोळ्यात रिकामपण उतरते.
नक्की काय होते?

श्वासावर श्वास
इतकेच जिवंतपण उरते.
नक्की काय होते?

- नी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - जिवंतपण