Submitted by नीधप on 20 April, 2011 - 01:08
माझी जुनीच कविता. 'आतल्यासहित माणूस' या प्रयोगातलीच.
--------------------------------------------
नि:शब्दाचे आभाळ
तुला मला व्यापून रहाते.
नक्की काय होते?
निराकार अथांग
सगळे वेढून घेते
नक्की काय होते?
काही उमटत नाही,
निश्चल हालचाल फक्त उरते.
नक्की काय होते?
काहीच घडत नाही,
निराश व्यापक उरी भरून येते.
नक्की काय होते?
आसू नाही, हासू नाही,
डोळ्यात रिकामपण उतरते.
नक्की काय होते?
श्वासावर श्वास
इतकेच जिवंतपण उरते.
नक्की काय होते?
- नी
गुलमोहर:
शेअर करा
आवडली
आवडली
मस्त आहे ही..
मस्त आहे ही..
श्वासावर श्वास इतकेच जिवंतपण
श्वासावर श्वास
इतकेच जिवंतपण उरते.
नक्की काय होते?>>>
मस्त.. सगळेच मस्तयेत..
छानच.
छानच.
व्वा!
व्वा!
मस्त आहे, खूप
मस्त आहे, खूप आवडली..
विशेषकरून..
>>नि:शब्दाचे आभाळ
तुला मला व्यापून रहाते.
नक्की काय होतं >> हे फारंच आवडलं...
पुलेशु!!
छान आहे.
छान आहे.
काहीच घडत नाही, निराश व्यापक
काहीच घडत नाही,
निराश व्यापक उरी भरून येते.
नक्की काय होते?>>>>>>>>>> सहीच.... सगळीच कविता आवडली
मस्तय ही कविता, आधी वाचल्याच
मस्तय ही कविता, आधी वाचल्याच नाही आठवते पण.
धन्स सगळे. श्यामले, २००५ मधली
धन्स सगळे.
श्यामले, २००५ मधली आहे बहुतेक तरी. जुन्या माबो वर असेल कदचित. पण तिथे खणणं जाम अवघड.
आवडली
आवडली
निश्चल हालचाल !!!! मस्त!
निश्चल हालचाल !!!!
मस्त! आवडली.
शेवटच्या ओळी जास्तच आवडल्या.
शेवटच्या ओळी जास्तच आवडल्या. आता नविन काहितरी लिवा की.
हे घे 'नविन काहितरी' सध्या
हे घे 'नविन काहितरी'
सध्या इतकेच
छान आहे खुप.
छान आहे खुप.
नी, सहीये कविता. 'निश्चल
नी, सहीये कविता. 'निश्चल हालचाल'
मस्तय...
मस्तय...:)
अरेच्या, मी तुझी ही एकही
अरेच्या, मी तुझी ही एकही कविता कशी काय नाही वाचलेली ?? मस्तच गं.
सगळ्याच चांगल्या आहेत.
आतल्यासहीत माणूस मधल्या अजून कविता कुठे वाचायला मिळतील का ?
मवा, धन्स! या बर्याचश्या
मवा, धन्स! या बर्याचश्या जुन्या माबो वर आहेत/ होत्या. अगं प्रयोगात एकुणात ५०-५२ कविता होत्या. माझ्या त्यातल्या ८-९ साधारण. त्या मी टाकेनच इथे हळूहळू. बाकीच्यांच्या मी कश्या काय टाकू?
नी, पुस्तक काढायला हवं आता.
नी, पुस्तक काढायला हवं आता.
अच्छा, मी तेव्हा कवितांच्या
अच्छा, मी तेव्हा कवितांच्या भानगडीत पडत नव्हते, किंवा मी तेव्हा नव्हतेच माबोवर.
मला मुक्तछंदातल्या कविता आवडतात. ज्या कविता न वाटता विचार किंवा अभिव्यक्ती वाटतात.
मामी म्हणतात तसं पुस्तक काढा या सगळ्या कवितांचं. किंवा मग शक्य असेल तर तो प्रयोग परत आणा.
मवा, ही घे प्रयोगाच्या
मवा, ही घे प्रयोगाच्या फोटूंची लिंक http://sites.google.com/site/neerajasspace/aatalyasahitmaan
मामी, पुस्तकासाठी किमान किती कविता असायला लागतात? माझ्या २४ च आहेत फक्त (काय तो विचित्र योगायोग!)
माझ्या अंदाजाने छत्तीस कविता
माझ्या अंदाजाने छत्तीस कविता असल्या तर छोटेखानी पुस्तक होते. साईझेबल हवे असल्यास ६४ किंवा ८०!
एक मात्र नक्की, आपल्या या कविता एका संग्रहात मिळाल्या तर खूपच उपयुक्त ठरावे. हे प्रामाणिक मत!
किशोर पाठकांच्या 'संभवा' या कवितासंग्रहाची प्रत मिळाल्यास जरूर वाचा असे आपले माझे मत! आपल्या या कविता त्यांच्या कवितांच्या नाण्याची नेमकी दुसरी बाजू आहे.
नाखुपबदिलगीर!
-'बेफिकीर'!
६४-८० ची संख्या गाठून पुस्तक
६४-८० ची संख्या गाठून पुस्तक काढायचं म्हणजे माझं सहस्त्रचंद्रदर्शन आणि पु.प्र. एकत्रच करावं लागेल.
६४-८० ची संख्या गाठून पुस्तक
६४-८० ची संख्या गाठून पुस्तक काढायचं म्हणजे माझं सहस्त्रचंद्रदर्शन आणि पु.प्र. एकत्रच करावं लागेल.>>
हा हा!
आपण लहान पुस्तक का करत नाही?
तसेही संख्येला काय महत्व असणार म्हणा!
(अवांतर - आपण कुठे असता मला माहीत नाही. पुण्यातील एखाद्या मायबोलीकराकडे मी आपल्यासाठी संभवा देऊ शकतो.)
-'बेफिकीर'!
खुप आवडली! <<आसू नाही, हासू
खुप आवडली!
<<आसू नाही, हासू नाही,
डोळ्यात रिकामपण उतरते.
नक्की काय होते<<
या ओळी खासच!
आजीबाईच्या बटव्यासारख्या एकेक
आजीबाईच्या बटव्यासारख्या एकेक अमुल्य चिजा बाहेर काढते आहेस. धन्स
स्वतःचा कवितासंग्रह प्रसिद्ध
स्वतःचा कवितासंग्रह प्रसिद्ध करणे याची एकेकाळी क्रेझ होती मला. हल्ली समहाउ तसं काही वाटत नाही. कवितासंग्रह प्रसिद्ध करण्यातली जी काय झिगझिग आहे ती करण्यापेक्षा तेवढीच झिगझिग करून आपलं आपलं नाटक करणं बर अश्या निष्कर्षाशी मी आलीये.
व्वा!!! मस्त आहे.
व्वा!!! मस्त आहे.
कवितासंग्रह फार कमी तयार होत
कवितासंग्रह फार कमी तयार होत आहेत नीधप! तिकडे मनोगतावर काही मराठीप्रेमी 'आमची मुले काही वाचतच नाहीत' म्हणत आहेत. बाकी तुमचा निर्णय योग्य असणारच, कारण ते क्षेत्र तुम्हाला पूर्ण माहीत आहे.
Pages