लग्न म्हणजे,
तसं लग्न म्हणजे
दोन जिवांचा मेळ
दोन भावनांच बंधन
दोन मनाचं मिलन जन्मभराचं
एकानं पसरलं तर दुसर्यानं आवरायचं
एकाचा तोल गेला तर दुसर्यानं सावरायचं
एक कोलमडला तर दुसर्यानं उभं करायचं
दोघांच्या घामानं संसाराची बाग फुलवायची
तिच्या सुगंधानं सभोवतालच्यांना आनंदीत करायचं
तेव्हाच, कधीतरी निर्माण होईल एक बंध
दोघांमधल्या विश्वासाचा
तो विश्वासच पोलादी गज
संसारच्या सोनेरी इमारतीमधले
लग्न म्हणजे,
तसं लग्न म्हणजे
दोन जिवांचा मेळ
दोन भावनांच बंधन
दोन मनाचं मिलन जन्मभराचं
एकानं पसरलं तर दुसर्यानं आवरायचं
एकाचा तोल गेला तर दुसर्यानं सावरायचं
एक कोलमडला तर दुसर्यानं उभं करायचं
दोघांच्या घामानं संसाराची बाग फुलवायची
तिच्या सुगंधानं सभोवतालच्यांना आनंदीत करायचं
तेव्हाच, कधीतरी निर्माण होईल एक बंध
दोघांमधल्या विश्वासाचा
तो विश्वासच पोलादी गज
संसारच्या सोनेरी इमारतीमधले
बाहेरच्या वार्या, वादळाशी झुंजण्यासाठी
कितीही भार पडला तरी न वाकण्याची
इमारतीला मानानं उभं ठेवण्याची
ताकद फक्त त्याच्यातच
बाहेरुन ते गज कधी नजरेत पडत नाहीत