दादला हातोडीनं ठोकतो खुट्टा
दादला हातोडीनं ठोकतो खुट्टा
ठोक ठोक ठोक ठोक ठोक ठोक (बॅकगाउंड हातोडीनं ठोकल्याचा आवाज)
ठोक ठोक ठोक ठोक ठोक ठोक
माझा दादला हातोडीनं ठोकतो खुट्टा
लाकूड तासून, रंधा मारून काढतो भुस्सा ||धृ||
कामं त्याचं हाय सुताराचं
आणतो लाकूडं सागाचं
करवतीनं कापत बसतो
रातीबी तसंच करतो
काय करावं समजना झालं
कामासाठी नुसता झालाय वेडापीसा
लाकूड तासतोय रंधा मारून काढतो भुस्सा ||१||
एकदा पलंग करायला लागला
मोजमाप करीत तो बसला
मी घरकामात गुंतलेली
मला बोलावलं त्यांनं तरीबी