Submitted by वर्षा_म on 14 March, 2011 - 06:37
थंडगार पाण्यासाठी माठ-रांजण
दिवाळीत पणत्यांनी उजळते अंगण
सांगा कोण देतो मातीला आकार
बघता बघता होतात भांडी साकार
>>>>> कुंभार
सुंदर दागिने आणि बाप्पाचा मुकुट
चांदीच्या उंदराला मोठ्ठी शेपूट
सांगा कोण घडवतो नाजुक बाळी
कलाकुसर करतो फुंकुन नळी
>>>>> सोनार
छोटेसे कपाट नको पसारा
देवबाप्पा साठी सुंदर देव्हारा
सांगा कोण बनवतो कृषी अवजारे
रंधा करवत याची हत्यारे
>>>>> सुतार
बनवतो तो चामडी चप्पल
पॉलिश करतो बुट आणि बक्कल
सांगा कोणाला म्हणतात चर्मकार
तुटता चप्पल याचाच आधार
>>>>> चांभार
तप्त लोखंडाला देउन बाक
तयार करतो बैलगाडीचे चाक
सांगा कोण वापरते ऐरण घण
भट्टीजवळ थांबुन रापले तन
>>>>> लोहार
गुलमोहर:
शेअर करा
हेहेहेहे मस्त गं बालकविता!!
हेहेहेहे मस्त गं बालकविता!!
फार मस्त!
फार मस्त!
धन्यवाद
धन्यवाद
वर्षा, एकदम परफेक्ट !
वर्षा, एकदम परफेक्ट !
आवल्डी ग कविता ...मत्त आहे
आवल्डी ग कविता ...मत्त आहे
मस्त ग वर्षा
मस्त ग वर्षा
मस्त वाटली बाल कविता
मस्त वाटली बाल कविता
ओळखा पाहू मी कोण?? वर आधारीत
ओळखा पाहू मी कोण?? वर आधारीत मस्त बालकविता..!
झक्कास.... मस्त फक्त हे जरा
झक्कास.... मस्त
फक्त हे जरा पटल नाही..
मुर्ती साकार >>>>> कुंभार, पन मुर्ती साकार मुर्तीकार करतो..
बघता बघता होतात भांडी साकार
सांगा कोण? कुंभार...
>>>>> ह्यच्या जागी "सांगा कोण?" अस कर, मग एकदम बालकवितेचा फील येतो...
बाकी तो येकदम झक्कास.... खुप दिवसानी बालकवितेची मज्जा आली...
प्रतिसादासाठी धन्यवाद
प्रतिसादासाठी धन्यवाद
सत्यजित तुला स्पेशल
मस्त वाटली बाल कविता
मस्त वाटली बाल कविता
मस्तच.
मस्तच.
छान छान! माझ्या बालबुद्धीला
छान छान! माझ्या बालबुद्धीला फारच आवडली.
>> चांदीच्या उंदरला मोठ्ठी शेपूट
हे उंदराला पाहीजे ना?
धन्स
धन्स
छान
छान
वर्षे, छानच जमलीये ग बालकविता
वर्षे, छानच जमलीये ग बालकविता
वर्षे मस्त कविता... आवडली
वर्षे मस्त कविता... आवडली
छानच ग वर्षाराणी!
छानच ग वर्षाराणी!
मस्तच गं वर्षे आता डॉक्टर,
मस्तच गं वर्षे
आता डॉक्टर, हेअर ड्रेसर, टेलर पण येऊ देत
आता डॉक्टर, हेअर ड्रेसर, टेलर
आता डॉक्टर, हेअर ड्रेसर, टेलर पण येऊ देत >> छे... आणलेच तर वैद्य , न्हावी , शिंपी आणेन
आणलेच तर वैद्य , न्हावी ,
आणलेच तर वैद्य , न्हावी , शिंपी आणेन<< आण बाई, तुझीच कविता आहे पण त्यांच्या शेवटी 'र' कसा आणशिल??
वैद्यर, न्हावीर आणि शिंपीर
छान आहे गं. लाजो
छान आहे गं.
लाजो
लाजो वर्षा, छान कविता.
लाजो
वर्षा, छान कविता.
सुरेख कविता लाजो
सुरेख कविता
लाजो
धन्स लोकहो जो हे पण खरेच
धन्स लोकहो
जो हे पण खरेच
वर्षे एक्दम जबरीच, मस्त,
वर्षे एक्दम जबरीच, मस्त, लेकीला पण खुप आवडली
धन्स स्मि
धन्स स्मि
मस्त गं वर्षे, सानिकाला पण
मस्त गं वर्षे, सानिकाला पण आवडली
खूप सुरेख.
खूप सुरेख.
छान कविता आहे,लहानांना आणि
छान कविता आहे,लहानांना आणि मोठ्यांनाही आवडण्यासारखी
Pages