ठरेन या जगात मी

ठरेन या जगात मी, महान एकदा तरी..

Submitted by मी मुक्ता.. on 23 February, 2011 - 05:36

बघेन र्‍हास कौतुके, गुमान एकदा तरी
ठरेन या जगात मी, महान एकदा तरी..

भले नको लुटू तुझे हजार चांद मजवरी
मिटून टाकु दे तुझ्यात, जान एकदा तरी..

जिथे विजेस लागलाय छंद कोसळायचा
उभे करीन त्या तिथे, मकान एकदा तरी..

करेल कुठवरी तमा, अशीच लोटली युगे
रचेल मूक क्रंदने, तुफान एकदा तरी..

जरी असेल शांत आज सूर या गळ्यातला
भिडेल उंच अंबरास, तान एकदा तरी..

गुलमोहर: 
Subscribe to RSS - ठरेन या जगात मी