ठरेन या जगात मी, महान एकदा तरी..

Submitted by मी मुक्ता.. on 23 February, 2011 - 05:36

बघेन र्‍हास कौतुके, गुमान एकदा तरी
ठरेन या जगात मी, महान एकदा तरी..

भले नको लुटू तुझे हजार चांद मजवरी
मिटून टाकु दे तुझ्यात, जान एकदा तरी..

जिथे विजेस लागलाय छंद कोसळायचा
उभे करीन त्या तिथे, मकान एकदा तरी..

करेल कुठवरी तमा, अशीच लोटली युगे
रचेल मूक क्रंदने, तुफान एकदा तरी..

जरी असेल शांत आज सूर या गळ्यातला
भिडेल उंच अंबरास, तान एकदा तरी..

गुलमोहर: 

जिथे विजेस लागलाय छंद कोसळायचा
उभे करीन त्या तिथे, मकान एकदा तरी..

जरी असेल शांत आज सूर या गळ्यातला
भिडेल उंच अंबरास, तान एकदा तरी..

आवडले!!

मतलाही आवडला हे सांगायचे राहिलेच

जिथे विजेस लागलाय छंद कोसळायचा
उभे करीन त्या तिथे, मकान एकदा तरी... व्वा..

आवडली गझल.

भले नको लुटू तुझे हजार चांद मजवरी
मिटून टाकु दे तुझ्यात, जान एकदा तरी..

जिथे विजेस लागलाय छंद कोसळायचा
उभे करीन त्या तिथे, मकान एकदा तरी..

क्लास!!

जिथे विजेस लागलाय छंद कोसळायचा
उभे करीन त्या तिथे, मकान एकदा तरी..

सही! चांगली गझल मुक्ता.

मुक्ता, तुझ्या लिखाणात खुपच सहजता आहे...मस्तच!!!

भले नको लुटू तुझे हजार चांद मजवरी
मिटून टाकु दे तुझ्यात, जान एकदा तरी..

जिथे विजेस लागलाय छंद कोसळायचा
उभे करीन त्या तिथे, मकान एकदा तरी..

हे दोन्हीही खरोखर मस्तच.... Happy

मुक्ता, उच्च!
सगळेच शेर आवडले.

जिथे विजेस लागलाय छंद कोसळायचा
उभे करीन त्या तिथे, मकान एकदा तरी..

जरी असेल शांत आज सूर या गळ्यातला
भिडेल उंच अंबरास, तान एकदा तरी..

यांना तोड नाही. Happy

तान मस्त... चांगला प्रयत्न आहे तुमचा ...

विजेचा शेर हा खालील शेराचे भाषांतर वाटतोय

फलक को चाह* थी जहां बिजलियां गिराने की
हमे भी जिद थी वही आशियां बनाने की

* - ह्या शब्दाबद्दल खात्री नाही

भले नको लुटू तुझे हजार चांद मजवरी
मिटून टाकु दे तुझ्यात, जान एकदा तरी..

जिथे विजेस लागलाय छंद कोसळायचा
उभे करीन त्या तिथे, मकान एकदा तरी..

व्वा! छान!!

रामकुमार