वादात या कुणीही (हझल)
वादात या कुणीही वर हा हझलचा प्रयत्न..!
वादात या कुणीही सहसा पडू नये
भावास मैत्रिणीच्या कधिही भिडू नये
देती न लक्ष कोणी, बागेकडे कधी
खुडतात फूल दिसता पाटी 'खुडू नये'
आहेर जेथ नाही, तेथे अवश्य जा
सुग्रास बेत असता का हादडू नये ?
महिना द्वितीय होता, चौदा दिनांकही
राखी समोर येता, मी गडबडू नये ?
नशिबात टायटॅनिक अन् रोझही हवी
तेव्हाच सार्थ बुडणे, अथवा बुडू नये
फ़सव्याच जाहिराती, मी सर्व जाणतो
फुकटात कार्ड मिळता का खरवडू नये ?
तांदूळ मी न धुतला, होईल फ्लर्टही,
नवरा न रागवावा तूही चिडू नये