Submitted by मी अभिजीत on 22 February, 2011 - 02:32
वादात या कुणीही वर हा हझलचा प्रयत्न..!
वादात या कुणीही सहसा पडू नये
भावास मैत्रिणीच्या कधिही भिडू नये
देती न लक्ष कोणी, बागेकडे कधी
खुडतात फूल दिसता पाटी 'खुडू नये'
आहेर जेथ नाही, तेथे अवश्य जा
सुग्रास बेत असता का हादडू नये ?
महिना द्वितीय होता, चौदा दिनांकही
राखी समोर येता, मी गडबडू नये ?
नशिबात टायटॅनिक अन् रोझही हवी
तेव्हाच सार्थ बुडणे, अथवा बुडू नये
फ़सव्याच जाहिराती, मी सर्व जाणतो
फुकटात कार्ड मिळता का खरवडू नये ?
तांदूळ मी न धुतला, होईल फ्लर्टही,
नवरा न रागवावा तूही चिडू नये
रानी, इशा, करीना याव्यात तारका
'नेने'शिवाय कोणी पण आवडू नये
-- अभिजीत दाते
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
आहेर जेथ नाही, तेथे अवश्य
आहेर जेथ नाही, तेथे अवश्य जा
सुग्रास बेत असता का हादडू नये ?
महिना द्वितीय होता, चौदा दिनांकही
राखी समोर येता, मी गडबडू नये ?
नशिबात टायटॅनिक अन् रोझही हवी
तेव्हाच सार्थ बुडणे, अथवा बुडू नये
तांदूळ मी न धुतला, होईल फ्लर्टही,
नवरा न रागवावा तूही चिडू नये
रानी, इशा, करीना याव्यात तारका
'नेने'शिवाय कोणी पण आवडू नये
अभिजीत, लई भारी.
अभिजीत, लई भारी.
नशिबात टायटॅनिक अन् रोझही
नशिबात टायटॅनिक अन् रोझही हवी
तेव्हाच सार्थ बुडणे, अथवा बुडू नये
रानी, इशा, करीना याव्यात तारका
'नेने'शिवाय कोणी पण आवडू नये
प्रचंड आवडले..........
देती न लक्ष कोणी, बागेकडे कधी
खुडतात फूल दिसता पाटी 'खुडू नये'
हजलेचा शेर वाटला नाही :), गझलेचा वाटला
रानी, इशा, करीना याव्यात
रानी, इशा, करीना याव्यात तारका
'नेने'शिवाय कोणी पण आवडू नये
व्वा...
लैच भारी! एकापेक्षा एक शेर,
लैच भारी! एकापेक्षा एक शेर, अगदी शेरास सव्वाशेर!
हरेक शेर आवडला.. मस्तच मस्तच
हरेक शेर आवडला..
मस्तच मस्तच मस्तच!!
रानी, इशा, करीना याव्यात
रानी, इशा, करीना याव्यात तारका
'नेने'शिवाय कोणी पण आवडू नये>>>>>
प्रचंड अनुमोदन...................

आवडलीच