इंडक्शन कुकटॉप : भारतात कितपत उपयोगी?
सकाळी रेड्डीट वाचताना एक इंडक्शन बद्दलचा धागा पाहिला. पण तिथली चर्चा मुख्यत्वे अमेरिकन परिप्रेक्ष्यातून असते.
तेव्हा आपल्याकडे इंडक्शनचा वापर गॅसपेक्षा चांगला होऊ शकेल का, याबद्दल मायबोलीवर विचारावे असे डोक्यात आले. त्यासाठी हा धागा.
जर तुमच्या गावात सारखे लाईट जात नसतील, तर इंडक्शन चा पर्याय गॅसपेक्षा स्वस्त, स्वच्छ, अधिक एनर्जी एफिशियंट वाटतो आहे.
गॅस वापरताना ५०% च्या आसपास उष्णता खोली गरम करण्यात वाया जाते असे दिसते. तेव्हा इंडक्शनने उर्जा बचतीसोबत आपल्याकडच्या गरम हवेत किचनमधली धग कमी ठेवणे हा फायदा होईल असे वाटते.