Submitted by पुरुष आयडी on 22 February, 2022 - 22:42
सकाळी रेड्डीट वाचताना एक इंडक्शन बद्दलचा धागा पाहिला. पण तिथली चर्चा मुख्यत्वे अमेरिकन परिप्रेक्ष्यातून असते.
तेव्हा आपल्याकडे इंडक्शनचा वापर गॅसपेक्षा चांगला होऊ शकेल का, याबद्दल मायबोलीवर विचारावे असे डोक्यात आले. त्यासाठी हा धागा.
जर तुमच्या गावात सारखे लाईट जात नसतील, तर इंडक्शन चा पर्याय गॅसपेक्षा स्वस्त, स्वच्छ, अधिक एनर्जी एफिशियंट वाटतो आहे.
गॅस वापरताना ५०% च्या आसपास उष्णता खोली गरम करण्यात वाया जाते असे दिसते. तेव्हा इंडक्शनने उर्जा बचतीसोबत आपल्याकडच्या गरम हवेत किचनमधली धग कमी ठेवणे हा फायदा होईल असे वाटते.
इंडक्शनसाठी वेगळी भांडी लागतात, हा एक तोटा, अन दुसरं म्हणजे आपल्याला गॅसची फ्लेम नजरेनेच पाहून तापमान कमीजास्त करायची सवय असते ते यात जमत नाही हा दुसरा.
तेव्हा याबद्दल इंडक्शन वापरणार्यांचे अनुभव व सल्ले ऐकायला आवडतील.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी वर्षानुवर्षे वापरतो , अगदी
मी वर्षानुवर्षे वापरतो , अगदी व्यवस्थित आहे
लाईट बिलही फार येत नाही
मेंटेनन्स होतो , रिपेअरपण होतो
https://www.maayboli.com/node/32716
हायला.
हायला.
१० वर्षं जुना धागा. माझ्या पाहण्यात आलेला नव्हता.
हो माझ्या मामेबहिणी कडे आहे.
हो माझ्या मामेबहिणी कडे आहे. बर्याच वेळा वापरते ती. मिनीमम हिट वर दूध वगैरे तापवुन झालेय. फार लक्ष देत बसावे लागत नाही, पदार्थ उतु वगैरे जात नाहीत.
त्यात टाइमर असल्याने काहीं
त्यात टाइमर असल्याने काहीं गोष्टी अनअटेंडेड करता येतात, आणि गॅसवर काही ठेवले विसरून गेलो आणि मग काहीतरी जळल्याचा वास आल्यावर तिकडे धाव घेतली हे प्रकारही थांबवता येतात.
उदा: मॅगी, बटाटे/अंडी उकडणे, दूध तापवणे, फ्रीज मधील गार दूध काढून विरजण लावण्यापुरते कोमट करून घेणे, कुकर लावणे (यात ठराविक मापाचे भात-वरण/खिचडी अनटेंडेड करू शकतो, जास्त लोकांचे करायचे असल्यास शिट्ट्या मोजून बंद करावे लागेल.)
अटेंडेड मध्ये मी फक्त पोळ्या, ऑम्लेट, भुर्जी एवढेच केलेय.
कारण एवढंच पाकृ न बघता व्यवस्थित जमतं. त्यात सुरवातीला कुकटॉप सुरू असताना वरील भांडे उचलू नये हे माहीत असूनही ऑम्लेट पलटी मारायला पॅन उचलला असे झाले काहीवेळा, मग एरर देऊन ट्रिप होतो कुकटॉप.
हो माझ्या मामेबहिणी कडे आहे.
हो माझ्या मामेबहिणी कडे आहे. बर्याच वेळा वापरते ती. मिनीमम हिट वर दूध वगैरे तापवुन झालेय. फार लक्ष देत बसावे लागत नाही, पदार्थ उतु वगैरे जात नाहीत.>>>> + 100 मी गेली 8 वर्षे वापरतेय. स्लो कुकिंग साठी बेस्ट. पोळ्या चांगल्या होत नाही एवढाच निगेटिव्ह पॉईंट
छानच चालतो. माझे गेली दहा
छानच चालतो. माझे गेली दहा वर्शे त्याव रच सर्व स्वयंपाक. अगदी बिर्याणी, बेडमी पुरी आलू दिवाळी फराळ उपासाचे पदार्थ. पँडेमिक मध्ये लॉक डाउन मध्ये मी इथे येता नाच विनोद कंपनीची स्टील भांडी घे तलेली जी इंडक्षन वर चालतात. अजून छान च आहेत.
माझे तळण पोळ्या प्राठे ठेपले बनवणे, इडली डोसे भात पुलाव वरणाचे प्रेश र कुकर सर्व त्यावर मस्त होते आता स वय झाली आहे.
मी मी असल्याने घरी एक फ्रेश बॅक अप इन्डक्षन पण नेहमी ठेवते कार ण शेवटी मशीन आहे कधीही दगा देउ शकते पाणी जाउ शकते बंद पडु
श कते.
आता स्वयंपाकच कमी झाला आहे. पण कुकटॉप थंड झाला की नीट पुसून साफ करुन ठेवावा. किटण बिल्ड अप होउ देउ नये.
व खालील पंख्यावर पण तेल कचरा जमतो तो साफ करत राहावे.
हो , एकदा सर्व्हिसिंग करावे
हो , एकदा सर्व्हिसिंग करावे
मुख्य फायदा म्हणजे रेशन कार्ड , कागद लागत नाहीत.
स्वयंपाक केला की लगेच स्विच ऑफ करू नये , त्याचा फॅन थोडा वेळ चालू रहातो , तो बंद झाल्यावर मग वरचा स्विच ऑफ करावा
इंडक्शन घ्यायचं धाडसच होत
इंडक्शन घ्यायचं धाडसच होत नाही... कोणीतरी सांगितलं होतं की यात भाज्या फोडणीला घातल्या, मसालेभात बनवला किंवा गेला बाजार चहा जरी बनवला तरी त्याला गॅसवर बनवल्याची चव येत नाही. वापरून बघणार्यांनी चवीत काही फरक पडतो का याबद्दल सांगितलं तर बरं होईल.
चवीत काही फरक पडत नाही. चहा
चवीत काही फरक पडत नाही. चहा,कोफी करणे, दूध तापवणे , पटकन गरम करून घेणे (मावे त करतो ते) ह्यासाठी उपयोगी आहे. पण पटकन व्हावं म्हणून जास्तीच्या तापमानावर ठेवलं तर मात्र उतू ही जातं.
असं असेल तर मग ठीक आहे..
असं असेल तर मग ठीक आहे.. नाहीतर चवीत फरक पडणार असेल तर तिथं कॉम्प्रमाईज करणं कठील होईल.
एकाच माणसाची अनेक घरे असतील
एकाच माणसाची अनेक घरे असतील तर सगळीकडे गॅस नाही ना मिळणार ?
मग दुसर्या घरात इंडक्शन लागेल ना ?
असं काही नाही.. मिळतो गॅस.
असं काही नाही.. मिळतो गॅस. वेगवेगळ्या कंपन्यांचे सिलेंडर्स घ्यायचे घरातील वेगवेगळ्या माणसांच्या नावे
बा द वे आताशा सिटित पाईप्ड गॅस पण असतोच. तरिही इंडक्शन ने चव बदलत नसेल तर तो वापरणे फायद्याचे ठरु शकत असावे.
DJ मला वाटते नीट अंदाज येत
DJ मला वाटते नीट अंदाज येत नाही तोवर एकंदरीत शिजवण्यात फकर पडून चवीत फरक पडु शकतो, पण अर्थात चहा वगैरे मध्ये नाही.
याव्यतिरिक्त काही पदार्थांना तसे फिनिश येत नसावे, वर मंजुताईंनी पोळ्या नीट होत नाही लिहिले आहे.
आता मी टेकनिकने केलेल्या पोळ्या आणि त्यांनी किंवा निपुण असलेल्या कुणीही कलेने केलेल्या पोळ्या, यात मुळातच तुलना होणार नाही. तेव्हा मी गॅसवर केल्या किंवा इंडक्शन सवय करून केल्या यात फारसा फरक नसणार.
उत्कृष्ट पोळ्या करणाऱ्यांना जाणवत असेल फरक. असे होत असावे अजून काही पदार्थांबाबत.
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे मानव. जोवर वापरण्यात सफाईदारपणा येत नाही तोवर इंडक्षन वरील कढईत फोडणी देणे, परतणे, भाजणे, शिजवणे मधे कमीजास्त होऊन चवीत फरक पडत असावा असे वाटते.. सफाईदारपणे स्वय्पाक जमू लागला की मग चव बिघडत नसावी असं वाटतंय. ख खो वा(परणारे) जा(णोत)..!
पोळी करता येईल चांगली, पण
पोळी करता येईल चांगली, पण 'निखार्याला लावणे' जमणार नाही, म्हणून गाकर, भाकरी, फुलके बाद. त्याला ओपन फ्लेम च लागते.
म्हणून गाकर, भाकरी, फुलके बाद
म्हणून गाकर, भाकरी, फुलके बाद. त्याला ओपन फ्लेम च लागते.>> बरोब र. आप्पे पात्र पण ईडक्षन मध्ये बसत नाही म्हणून आप्पे होत नाहीत.
फ्लॅट बेस चीच भांडी लागतात.
इंडक्शन बेस आप्पे पात्र
इंडक्शन बेस आप्पे पात्र मिळतात ते वापरलेत का कोणी?
ही पोस्ट फारीनच्या इंडक्शन
पोस्ट काढून टाकली आहे.
स्वच्छता अत्यंत त्रासाचं काम
स्वच्छता अत्यंत त्रासाचं काम आहे, कारण सांडलेले कण, उडलेले थेंब तापत राहतात आणि चिकटून बसतात.>>> त्यासाठी Induction Glass Ceramic Stove Cooktop Heavy Duty Cleaner मिळते. नाहीतर बेकींग सोडा अन व्हिनेगर वापरता येते.
अनेकवेळा घर बदलावे लागले तेव्हा गॅस/ कॅाईलची शेगडी/ इंडक्शन जे पदरी पडेल ते वापरावे लागले. जोपर्यंत अंदाज येत नाही तोपर्यंत ऊतू जाणे, जळणे, कच्चे राहणे याचा अनुभव येतो. मग आपले आपल्या स्टोव्हशी गणित जुळते. सपाट बुडाची भांडी सगळीकडे वापरता येतात.
अमितव, उपयोगी माहिती...!!
अमितव, उपयोगी माहिती...!!
अमितव, तुमच्याकडचा स्टोव्ह
संपादीत.
अमितव, बॅड बॉय.
अमितव, बॅड बॉय.
मानव तसाच असावा. तुमची पोस्ट
मानव माझा गोंधळ झालाय बहुतेक.
ओके.
ओके.
परून बघणार्यांनी चवीत काही
परून बघणार्यांनी चवीत काही फरक पडतो का याबद्दल सांगितलं तर बरं होईल.>>
चवीत फरक पडतो. मला शब्दात एक्स्प्लेन करता येत नाहीये नेमका कसाअ ते. पण तो फरक चांगला वाईट असा नाही. गीझर आणि बंबाच्या पाण्यात फरक जाणवतो ना तस काहीस. म्हणजे दोन्ही पाण्याच तापमान एकच असेल पण स्पर्श काहीतरी वेगळा असतो तस.
अमितव आणी मानव.
अमितव आणी मानव.
उपयोगी व रिलेव्हंट पोस्ट्स का काढून टाकताय?
ग्लास टॉप असेल तर स्वच्छ
ग्लास टॉप असेल तर स्वच्छ करायला काही त्रास होत नाही. आता तिथे भारतात पण बरीच मॉडेल मिळतात तेव्हा ग्लास टॉप पण मिळत असेल. मी इथे गेली अ-ने-क वर्ष वापरते आहे. रोजच्या पोळ्यांपासून भाज्या-आमट्या-बटाटे वडे-बिर्याणीची रेसिपी वापरून केलेला भात
सर्व प्रकार व्यवस्थित होतात. अगदी भाकरी सुद्धा करता येतात, पापड भाजायची जाळी वापरून भाजाव्या लागतात. भाज्या, डाळ-तांदूळ खिचडी, मभा, इ तर हीट बंद करून स्लो-कुकिंग सारखं शिजवते, आता सवय झाली आहे. वांगं, कांदा, मिरच्या, पापड भाजणे अजिबात करता येत नाही. किचकट तळणीचे पदार्थ ज्यात तापमान मेन्टेन करावे लागते ते मला जमलेले नाहीत. उदा: गुजा, करंज्या. वेगळी भांडी-बिंडी मी काही आणलेली नाहीत. नॉन-स्टिक, लोखंड, स्टील, कॉपर बेस, अॅल्युमिनियम सगळी प्रजा या ग्लासटॉपवर शेकून निघते. एक आहे, पसरट बुडाची भांडी वापरली तरच नीट तापतात. बाकी चवीत ढिम्म फरक पडत नाही.
नेहमी स्वयंपाक करणार्याला याची सवय व्हायला फार काही वेळ लागतो असं पण नाही. आई इथे आली होती तेव्हा तिला १-२ दिवसांतच कल्पना आली. तिनं तर अनारसे पण केले होते. माझी तेवढी ऐपत नाही.
माझा प्रतिसाद ग्लास टॉप
माझा प्रतिसाद ग्लास टॉप डोक्यात ठेवुन होता. इंडक्शन मध्ये इलेक्ट्रोमॅनगेटिक परिणामाने उर्जा भांड्यात तयार होते वाचल्यावर माझी पोस्ट इररेलेवंट आहे समजलं म्हणून काढली.
हो की, माझा पण ग्लासटॉपसाठीच
हो की, माझा पण ग्लासटॉपसाठीच आहे.
आरारा, त्यांनी पोस्ट काढली
आरारा, त्यांनी पोस्ट काढली आणि माझी पोस्ट त्यावर टिप्पणी होती ती रिलेव्हंट रहाणार नाही म्हणुन काढली.
असो. आता सिंडरेला यांची पोस्ट वाचून लक्षात आले की तिकडले काही लोक आपल्याकडे मिळतो तशा इंडक्शन कुकटॉप बद्दल बोलत नाहीयेत. तिकडे नक्की कसा मिळतो माहिती नाही पण जे लिहिलंय त्यावरून तो इंडक्शन नसुन पूर्णपणे रजिस्टिव्ह कॉईल, किंवा रजिसस्टीव्ह कॉईल + रेडिएशन / इंडक्शन असे कॉम्बिनेशन असावे असे वाटते.
पूर्ण इंडक्शन स्टोव्हमध्ये हीट फक्त आणि फक्त भांड्याच्या बुडातच तयार होते. कॉईल मध्ये तयार होऊन वर भांड्याला ट्रान्सफर होत नाही.
इंडक्शन स्टोव्ह फक्त alternating magnetic flux तयार करतो.
यासाठी इंडक्शन टॉपवर फक्त जाड आणि सपाट बुडाचीच भांडी वापरता येतात. ती फेरस / फेरोमॅग्नेटिक असली पाहिजेत. कॉपर / ऍल्युमिनियम चालत नाहीत. त्यांच्या बुडाला फेरोमॅग्नेटिक जाड लेयर दिली असतील तर चालतील.
त्या बुडात मग त्या alternating magnetic flux मुळे Eddy currents तयार होऊन त्याने हीट जनरेट होते. म्हणजे बूड इलेक्ट्रीक करंट रजिस्टीव्ह असला पाहिजे. गूड कंडक्टर असेल तर हीट कमी जनरेट होणार नाही/फार कमी जनरेट होईल.
यासाठी टोटली नॉन फेरोमॅग्नेटिक / जास्त निकेल असलेले स्टेनलेस स्टीलही चालणार नाही.
बूड फेरोमॅग्नेटिक मटेरियलचे असेल तर वर कुठलेही मेटल चालेल.
तेव्हा इंडक्शन स्टोव्ह साठी भांडे घेताना - इंडक्शन बेस ग्रेडचेच आहे ना याची खात्री करून घ्यावी.
इंडक्शन स्टोव्ह वर भांडे ठेवल्या शिवाय त्यातील इंडक्शन कॉइल ऑन होत नाही, असा फिचर दिला असतो. ते फिचर बायपास केले तरी त्यावर फेरोमॅग्नेटिक बुडाचे भांडे ठेवल्या शिवाय हीट तयार होणार नाही.
इंडक्शन स्टोव्ह बंद केला की आच (हीट जनरेट होणे) तत्क्षणी पूर्णपणे बंद होते, अगदी गॅस बंद केल्यासारखी.
पण जाडबुडाचे भांडे असल्याने नेहमीच्या पातळ बुडाच्या भांड्यापेक्षा बुडात जास्त हीट साठली असते, ती पदार्थात जरा वेळ येणार. हे गॅसवर तेच जाड बुडाचे भांडे ठेवून गॅस बंद केल्यास जसे होते तसेच होईल. (नाही म्हणायला, गॅस बंद केल्यावर खालील बर्नर आणि बूड यात एअर गॅप असल्याने तिथून थोडेसे कुलिंग होईल एव्हढासाच काय तो फरक.)
तर जाड बुडामुळे अशी थोडी हीट साठली असते हे काही पटकन करपणारे पदार्थ करताना लक्षात ठेवावे.
स्टोव्हच्या टॉपवर पदार्थ /कण पडल्यास ते जळणार नाहीत, त्यांना हीट मिळणे लगेच बंद होईल.
पण उतू जाणे/सांडणे झाले आणि त्याच्या पॅनलवर आले तर लगेच साफ करावे लागेलं, नाहीतर पॅनल/बटणं खराब होऊ शकतात. हा भाग सोडता इंडक्शन स्टोव्ह साफ ठेवणे फार कठीण नाही.
आरारा, त्यांनी पोस्ट काढली
आरारा, त्यांनी पोस्ट काढली आणि माझी पोस्ट >>> दिवंगत आयडी आरारा यांच्या A पवित्र स्मृतीस विनम्र श्रद्धांजली !
इंडक्शनसाठी वेगळी भांडी
इंडक्शनसाठी वेगळी भांडी लागतात, हा एक तोटा, अन दुसरं म्हणजे आपल्याला गॅसची फ्लेम नजरेनेच पाहून तापमान कमीजास्त करायची सवय असते ते यात जमत नाही हा दुसरा. >>
मानव, डॉक नी वेगळी भांडी लागतात अस स्पेसिफिकली लिहिलय त्यावरून ते ग्लास टॉप विषयी नसुन इंडक्शन(इथल्या पण इंडक्शन ) विषयीच बोलताहेत माझ्या मते. ग्लास टॉप माझ्यामते भारतात मिळत नाही. इथे ग्लास टॉप आणि इंडक्शन असे मिळतात. माझ्याकडे छोटा एक बर्नरचा इंडक्शन आहे. आणि भारतात पण सासरी बघितलेला.
ग्लास टॉप आणि induction दोन्हीला ठरावीक भांडीच पाहीजेत. फंक्शनॅलिटी सिमिलर आहे. दिसतात पण सिमिलर.
ओह तिकडे ग्लास टॉप म्हणजे
ओह तिकडे ग्लास टॉप म्हणजे पूर्ण स्टोव्हचाच वेगळा प्रकार आहे तर.
इकडे गॅस स्टोव्हला वर ग्लास असेल तर त्याला म्हणतात.
गोंधळ होणारच मग.
--------
सीमा, कॉईल मधून alternating magnetic flux तयार करून त्यातून फेरोमॅग्नेटिक मटेरियल मध्ये हीट तयार करणे यालाच induction heating असे म्हणतात. (आणि त्या कॉईलला इंडक्शन कॉईल हे नाव.) त्यामुळे इंडक्शन कूकटॉप हे नाव.
ग्लास कूकटॉप नक्की काय प्रिन्सिपलवर चालते माहीत नाही, नावावरून तसा काहीच बोध होत नाही. मला ते इलेक्ट्रीक शेगडी sophisticated करून स्मार्ट फिचर्स ऍड करून बनवली असावी असे वाटते. त्यातही सपाट बुडाचे भांडे असणेच उत्तम, पण जाड फेरोमॅग्नेटिक बूडाचे असलेच पाहिजे असे नाही, कुठलेही मेटल चालेल. इंडक्शन बेस असलेली भांडी सगळ्याच कूकटॉपवर चालतील.
(No subject)
असे असते
हा धागा https://www.maayboli
हा धागा https://www.maayboli.com/node/12204 ह्या ग्रुपात हवा.
कॉईल मधून alternating
कॉईल मधून alternating magnetic flux तयार करून त्यातून फेरोमॅग्नेटिक मटेरियल मध्ये हीट तयार करणे यालाच induction heating असे म्हणतात. (आणि त्या कॉईलला इंडक्शन कॉईल हे नाव.) >>
हो बरोबर. तोच मेजर डिफर्न्स आहे. आणि त्यामुळेच ठरावीक भांडी वापरण गरजेच. इथे अगदी सोप्या भाषेत सांगितलय.
https://www.baconappliance.com/blog/difference-between-induction-and-gla...