काटकुळ्या शरीरयष्टीचा त्रिंबककर पिशवी हलवत बाजारातून साहेबांच्या घराकडे निघाला. रस्त्याच्या कडेने सवयीने अंग चोरत तो पावलं टाकत होता. चालता चालता ’थूऽऽऽ...’ विचित्र आवाज करत पान कोंबलेल्या तोंडानेच तो रस्त्याच्या बाजूला थुकला. त्याचे एक दोन थेंब फाटक्या विजारीवर उडाले. त्याला दु:ख झालं. घरी गेल्यावर कैदाशीण जिवंत ठेवणार नाही याची त्याला खात्री होती. थुकी लावून ते छोटे ठिपके त्याने घालवायचा प्रयत्न केला पण विजार आणखीनंच रंगली. काय करावं ते त्याला कळेना तितक्यात कुणीतरी त्याच्या पाठीवर जोरात थाप मारली. त्याचं बारकुळं शरीर हादरा बसल्यासारखं डळमळलं. कसाबसा त्याने तोल सांभाळला.
सध्या पुण्यात बावधनच्या आसपास व कोथरुडमधे "मोक्याच्या ठिकाणे नसलेल्या" दुकानाची किंमत जवळपास ३५ ते ४० लाखाच्या आसपास आहेत. तेवढ्याच किमतीत साधारणपणे रिसेलचा वन बिएच्के फ्लॅट मिळतो. मी व नवरा नोकरीत आहोत व सध्या तरी नोकरी सोडायचा कोणताही प्लॅन नाही. पण अजून काही वर्षांनी बरे होईल म्हणून दुकान घेऊन ठेवावे का असा विचार करतो आहोत. एजंट च्या मते दुकान घेऊन ठेवण्यापेक्षा "दुसरे" घर घेऊन ठेवणे जास्त चांगले कारण घरातली गुंतवणूक दुकानापेक्षा जास्त परतावा देते. लगेचच्या लगेच चालवायचे असेल तरच दुकान घेउन ठेवावे असे त्याचे मत. तर घर की दुकान ? कोणी अनुभवी मार्गदर्शन करू शकतील का ?
आजचीच गोष्ट. बॅंकेत काम होतं म्हणून भर पावसात चाकंतोड करत दीपक टॉकीजजवळच्या बॅंकेत गेले होते. नेहमीप्रमाणे एका दगडात अनेक पक्षी मारायचे म्हणून त्या त्या एरीयातली दोन्-चार कामं असतातच बरोबर. म्हणून कालच आणलेल्या चिनी बनावटीच्या टेबललँपच्या प्लगला अॅटॅचमेंट, बॅटरीवर चालणार्या मेणबत्त्यांकरता छोट्या बॅटर्या असे इलेक्ट्रीकच्या दुकानाशी संबधित कामं होती. बँकेशेजारीच एक इलेक्ट्रीक आणि हार्डवेअरचे दुकान दिसले. हे कॉम्बिनेशनमध्ये दुकान का बरं चालवत असतील? हा मला नेहमीच पडणारा सनातन प्रश्न आहे. तो पुन्हा डोक्यात पिंगा घालायला लागला.