पाऊस भटकंती

शुभारंभ

Submitted by योगेश आहिरराव on 23 June, 2015 - 08:11

सह्याद्रीत केलेल्या स्वच्छंद भटकंतीचे मुक्त व्यासपीठ म्हणून मायबोलीची कीर्ती कानी आली आणि इथे आपली लिखाणाची शैली आजमावून बघू ह्या विचाराने "पावसाळी भटकंतीचा शुभारंभ. नाणेघाट - भोरांड्याचे दार" हा पहिलाच लेख पोस्ट करत आहे. पावसाने केलेल्या मुक्त संचारामुळे सह्याद्रीचं सौंदर्य कॅमे-यात टिपता आलंही नसेल कदाचित पण लिखाणाच्या माध्यमातून हि कसर भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे.

पहिलाच प्रयत्न असल्याने चूक भूल देणे घेणे. मायबोलीवर नवीन असल्याने इथल्या लेखनाशी निगडीत तांत्रिक बाबींशी ओळख व्हायला थोडा वेळ लागेल. तोपर्यंत गोड मानून घ्या ही नम्र विनंती.

विषय: 
शब्दखुणा: 

सिध्धगड अन भेटलेला पाऊस......

Submitted by रोहित ..एक मावळा on 4 December, 2010 - 05:30

अरे या रविवारी नाही जमणार...पुढच्या रविवारी नक्की...अस करत सरतेशेवटी २९ ऑगस्टला जायच ठरल.आदल्या रात्री पावसाने गडगडासह जोरदार आगमन केले.व्वा...हेच तर पाहिजे होते.ट्रेकिंगला वा कुठेही भटकायला जायच असेल तर आदल्या रात्री झोप येत नाही.तसेच झाले...आणि सकाळी तरीपण पावनेसहाला उठलो.आईने एवढ्या सकाळी उठुन डबा केला होता.सॅक पाठिला लटकविली आणि आईच्या भाषेत बोलायच तर उंडरायला निघालो.सकाळी पावसाची भुरभुर चालु होती.वातावरण पण एकदम प्रसन्न होते.ठाणे महानगरपालिकेची कृपा म्हणजे टि.एम.टि पकडुन ठाणे स्टेशनला पोहोचलो तर सव्वासात वाजले होते.रविवार असुनसुद्धा टिकिट काढायला भली मोठी रांग लागली होती.मग पन्नास रुपय

Subscribe to RSS - पाऊस भटकंती