ढाक बहिरी
एका प्रवासाची गोष्ट
शनिवार, १९ नोव्हेंबर २०११ रोजी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सीएसटीहून सुटलेल्या "११०२३ डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस,कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस"मधल्या दोन तासांच्या प्रवासाची ही गोष्ट आहे!
गिरिकुहरांमधील भैरव-ढाक बहिरी
राजमाचीहून पाहिले असता मांजरसुबा डोंगरपलीकडे जो डॊंगर आपल्या कातळभिंतींच्या भुजा थोपटत उभा असतो तोच प्रसिद्ध "ढाक बहिरी".आपणा डोंगरभटक्यांना या वनदेवाची ओळख करुन दिली ती दुर्गमहर्षी गो.नी.दांडेकरांनी.या भैरवाचे दर्शन अंतरिची ओढ असल्याखेरीज मिळणारच नाही.अश्या या ढाकदुर्गाच्या पोटातील गुहेमधे अनादी काळापासुन या दुर्ग(म)देवतच वास्त्व्य आहे.ढाकदुर्ग आणि काळकराय सुळका यामधील चिंचोळी खिंड,उभ्या कड्याच्या छातीवरुन पाय ठेवायला अवघी काही बोटं असलेला आडवा ट्रेवर्स,खाली हिडिंबेप्रमाणे आ वासुन आपला घास घेण्यास सिद्ध असलेली दरी,सर्वात शेवटी लाकडी मोळी आणि दोरखंड याना लटकून पार करावा लागणारा कातळटप्पा ह