मभागौदि २०२५ शशक- क्रोध – Sharmila R
Submitted by SharmilaR on 23 February, 2025 - 04:57
मभागौदि २०२५ शशक- क्रोध – Sharmila R
लांबूनच दिसला, सिग्नल हिरवा होता. तिने वेग वाढवला. सेकंद संपले..? आहे.. आहे.. मध्येच पिवळा दिवा लागल्यासारखा दिसला तिला.
तिने वेगाने गाडी उजवीकडे वळवली. पलीकडून कर्कश्य हॉर्न वाजला.
‘त्याने हॉर्न का दिला? स्टील इट वॉज माय सिग्नल.’ तिने उजवीकडे मान करत त्याला विचारले.
कुणी हॉर्न देणं हा गाडी चलवणाऱ्याचा अपमान होता येथे.
‘इट वॉज हिज टर्न.. तू थांबायला हवं होतस.’ तो शांतपणे म्हणाला.
‘नो.. माझं लक्ष होतं..’ ती किंचाळतच म्हणाली.
तो गप्पच बसला.
विषय:
शब्दखुणा: