रक्तपिपासू भाग २
Submitted by प्रथमेश काटे on 18 November, 2024 - 10:04
*आज पौर्णिमा होती. टिपूर चांदण्याची झिलई गावावर पसरलेली. आज बऱ्याच दिवसांनी मुलांना आजी कडे गोष्ट ऐकायला जायचं होतं. रस्त्यात एकत्र जमून ते आजीच्या घरापुढे असलेल्या पिंपळाच्या झाडाकडे निघाले. रस्त्यावर दिव्यांचे खांब होतेच. शिवाय आजूबाजूची घरं रोषणाईने झगमगलेली. त्यामुळे त्यांना कसलीही भीती नव्हती. पण काही अंतर चालून जातात न जातात तोच एकदम मागून आवाज आला -
" ए पोरांनो ? "