तुझा नि माझा पाऊस

तुझा नि माझा पाऊस,गेला मनात राहून

Submitted by विनोद इखणकर - श... on 29 May, 2024 - 04:46

शीर्षक:- तुझा नि माझा पाऊस,गेला मनात राहून

येता पावसाच्या सरी
ओले करुनी अंगण
जाते स्पर्शून मनाला
येते तुझी आठवण

दिसे चेहरा सुंदर
काळ्या निळ्या आकाशात
भेट पहिली दोघांची
झाली भर पावसात

देह तुझा ओलाचिंब
कसा साचवू डोळयात
मिटे पापणी लाजेची
दिसे तुझ्या नजरेत

वीज कडके ढगात
पडे पाऊस जोराचा
हात हातात घेऊन
ठसा उमटे ओठाचा

दरवळ पसरली
गंध देऊन मातीला
दिला होकार नात्याला
आला बहर प्रेमाला

Subscribe to RSS - तुझा नि माझा पाऊस