Submitted by विनोद इखणकर - श... on 29 May, 2024 - 04:46
शीर्षक:- तुझा नि माझा पाऊस,गेला मनात राहून
येता पावसाच्या सरी
ओले करुनी अंगण
जाते स्पर्शून मनाला
येते तुझी आठवण
दिसे चेहरा सुंदर
काळ्या निळ्या आकाशात
भेट पहिली दोघांची
झाली भर पावसात
देह तुझा ओलाचिंब
कसा साचवू डोळयात
मिटे पापणी लाजेची
दिसे तुझ्या नजरेत
वीज कडके ढगात
पडे पाऊस जोराचा
हात हातात घेऊन
ठसा उमटे ओठाचा
दरवळ पसरली
गंध देऊन मातीला
दिला होकार नात्याला
आला बहर प्रेमाला
थोडे थोडे पडे ऊन
टिपे सुवर्ण हे क्षण
तुझा नि माझा पाऊस
गेला मनात राहून
- विनोद इखणकर
नाशिक (शब्दप्रेम)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे. टिपिकल प्रेमकवितेचा
छान आहे. टिपिकल प्रेमकवितेचा विषय असला तरी लिहिली आहे खूप छान. सोपे शब्द आणि नादमय ओळी.