स्पायसी पिनट

स्पायसी पिनट

Submitted by एम.जे. on 28 May, 2024 - 14:51

भेळेमध्ये चिरलेला पालक आणि सॅलड कसं लागेल? आमच्याकडे असे प्रश्न नुसते पडत नाहीत. भेळेचा साग्रसंगीत घाट घालून संशोधनाचा प्राथमिक प्रयोग लगेच अंमलात आणला जातो. मटकी भेळ, कॉर्न भेळ हे भेळेचे उपप्रकार म्हटले तरी खरी भेळ चुरमुऱ्याचीच. चुरमुरे थोडे फोडणीला टाकलेले असले की काम झालं, फक्त त्यात परतलेले तेलावरचे भाजके शेंगदाणे पाहिजेत. बारिक कापलेला कांदा, टोमॅटो, कैरी त्यावर फरसाण, चाट मसाल्यासह पुदिन्याची झणझणीत आणि चिंचगुळाची आंबटगोड चटणी टाकल्यावर चुरचुरणारे चुरमुरे कालवत होणारी भेळ… मग त्या भेळेचं पौष्टिकत्व वाढवण्याच्या हेतूने त्यात घातलेली काकडी, लाल मुळा, उकडलेला बटाटा ही मंडळी.

Subscribe to RSS - स्पायसी पिनट