अमेरिकेत रिटायरमेंट

अमेरिकेत रिटायरमेंट ३): तब्येत वगैरे

Submitted by sneha1 on 21 May, 2024 - 22:52

तसे म्हटले तर तब्येतीची म्हातारपणासाठी आधीपासून काळजी घेणे हे कुठेही सारखेच असेल म्हणा. पण काय केले तर म्हातारपण ह्या देशात सोपे होईल यावर इथे बोलता येईल. जसे म्हातारपणी बाथरूममध्ये धरायला हँडलस लावावेत वगैरे किंवा अजून काही. हा पॉईंट मला नीट मांडता आला नाही खरे.

अमेरिकेत रिटायरमेंट २): आर्थिक बाबी

Submitted by sneha1 on 21 May, 2024 - 22:50

इथे आर्थिक बाबींची चर्चा करता येईल. ४०१ के बद्दल खूप लोकांना माहिती असते. पण बाकी गुंतवणुकी कशा कराव्यात, टॅक्स कसा वाचवावा, मेडीकेअर बरोबर सप्लीमेंटल इन्शुरन्स कसा घेतला तर फायदेशीर ठरते आणि अशा अनेक गोष्टींबद्दल बोलता येईल.
एक नवीन गोष्ट मध्ये कळली. खूप जण HSA card घेतात आणि त्यातून डॉक्टरांची बिलं देतात. पण मध्ये परिचितांनी सांगितले की जमतील तेव्हढे पैसे HSA account मध्ये टाकावे, पण तुम्ही कमावत असता तोपर्यंत दुसर्या एखाद्या कार्डातून ही बिलं भागवावी. म्हणजे म्हातारपणी HSA account मधील पैसे गरजेनुसार वापरता येतील.

अमेरिकेत रिटायरमेंट १): घर डाऊनसाईझ करावे की नाही

Submitted by sneha1 on 21 May, 2024 - 22:47

अमेरिकेत रिटायरमेंट असा वेगळा धागा सापडला नाही. आणि चर्चा करणे सोपे व्हावे म्हणून आर्थिक , तब्येत असे वेगळे धागे काढते आहे.

Subscribe to RSS - अमेरिकेत रिटायरमेंट