Submitted by sneha1 on 21 May, 2024 - 22:50
इथे आर्थिक बाबींची चर्चा करता येईल. ४०१ के बद्दल खूप लोकांना माहिती असते. पण बाकी गुंतवणुकी कशा कराव्यात, टॅक्स कसा वाचवावा, मेडीकेअर बरोबर सप्लीमेंटल इन्शुरन्स कसा घेतला तर फायदेशीर ठरते आणि अशा अनेक गोष्टींबद्दल बोलता येईल.
एक नवीन गोष्ट मध्ये कळली. खूप जण HSA card घेतात आणि त्यातून डॉक्टरांची बिलं देतात. पण मध्ये परिचितांनी सांगितले की जमतील तेव्हढे पैसे HSA account मध्ये टाकावे, पण तुम्ही कमावत असता तोपर्यंत दुसर्या एखाद्या कार्डातून ही बिलं भागवावी. म्हणजे म्हातारपणी HSA account मधील पैसे गरजेनुसार वापरता येतील.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चांगला रिटायरमेंट कॅलक्युलेटर
चांगला रिटायरमेंट कॅलक्युलेटर माहिती आहे का कोणाला. गूगल केले तर इतके इतके दिसतात की गोंधळ होतो.
Tools and Calculators
Tools and Calculators
मस्त आहे लिन्क, चांगली माहिती
मस्त आहे लिन्क, चांगली माहिती आहे उपाशी बोका.
<< चांगला रिटायरमेंट
<< चांगला रिटायरमेंट कॅलक्युलेटर माहिती आहे का कोणाला. गूगल केले तर इतके इतके दिसतात की गोंधळ होतो. >>
------- Excel किंवा numbers किंवा कागद + पेन्सिल मधे जमा-खर्चाचे गणित मांडा.
मालमत्ता Assets - एकूण मालमत्ता किती आहे ? यात घर, फार्म हाऊस, गाडी, घोडे, सोने, चांदी, रोख कॅश, GIC/ bonds...
एखादे अघटीत घडल्यावर किती $ चा विमा आहे? नसेल तर घेण्याची अवशक्ता आहे का? हा का घ्यावा/ घेऊ नये हे वैयक्तिक आहे. माझ्याकडे $ १००,००० आहेत, मी गेल्यावर तो पैसा माझ्या बायकोला/ मुलीला मिळतांना त्यांना जो inheritance टॅक्स भरावा लागेल तो या विम्याच्या पैशातून जाईल अशी योजना असते. जेव्हढा कर भरावा लागेल (५० % धरा) तेव्हढ्याचा विमा असे ढोबळ गणित काही लोक मांडतात.
मासिक उत्पन्न - उत्पन्नाचे स्त्रोत काय काय आहेत, किती आहेत, कधी सुरु होणार आहेत, किती काळापर्यंत सुरु रहातील ? जोडीदाराचे उत्पन्नाचे स्त्रोत पण सोबत जोडा.
मासिक खर्च- महिन्याचा अपेक्षित असलेला खर्च. आधीच्या म्हणजे नोकरी करत असतांना होणार्या खर्चाच्या साधारण पणे ६५ % निवृत्तीकाळांत लागतील असे गृहित धरुन चला.
प्रवास, छंद, भेटी/गिफ्ट, पुस्तके, चॅरिटी, गाडीचा खर्च पण गृहित धरा. सुरवातीला प्रवास जास्त होतो, नंतर शरिराच्या तक्रारी वाढतात आणि प्रवास कमी होतो पण तो पैसा आरोग्या च्या देखभाल करण्याकडे वळविता येतो.
स्वत: चे घर असेल तर देखभालीचा खर्च आहे. हिवाळ्यांत हिटर निकामी झाले, गाडी बंड पडली तर निकडीच्या प्रसंगांत सहजपणे उपलब्द होतील अशी एक छोटी रक्कम कायम हाताशी असायला हवी.
दायित्व Liabilities - घराचे कर्ज, गाडीचे कर्ज, घरांत कुणी लहान असेल तर शिक्षणाचा / लग्नाचा खर्च
दोन पैकी एक व्यक्ती नसली तर मासिक उत्पन्नाचे गणित बदलते. विज/ पाणी/ घराचा वार्षिक कर आणि इतर खर्च कमी होत नाही पण मासिक उत्पन्नाचे आकडे (कॅनडामधे Canada Pension Plan, Old Age Security किंवा कुठे Employer pension plan असला तर) नक्की कमी होतात.
कॅनडाच्या बाबतीत, CPP/ OAS हे
कॅनडाच्या बाबतीत, CPP/ OAS हे केव्हा ( वयाच्या ६०, ६५, ७० व्या वर्षी ) सुरु करायचे जेणेकरुन एकंदर कर कमी भरावा लागेल याचे नियम आहेत. उत्पनाचा हा भाग किती आहे हे केव्हाही पडताळता येते. कुठले आर्थिक स्त्रोत केव्हा वापरायला सुरु करायला हवे याबाबत प्रत्येकाची गरज आणि कर संबंधातली परिस्थिती वेगळी असू शकते.
certified financial planner हे या बाबत जास्त चांगली मदत करु शकतात.
ट्रस्ट हे प्रकरण काय असते?
ट्रस्ट हे प्रकरण काय असते?
मुलांवर पडणारा टॅक्स वाचवायचा तो एक मार्ग आहे म्हणतात.
अमेरिकेतील कायद्यानुसार माहिती द्यावी ही विनंति.