अमेरिकेत रिटायरमेंट ३): तब्येत वगैरे

Submitted by sneha1 on 21 May, 2024 - 22:52

तसे म्हटले तर तब्येतीची म्हातारपणासाठी आधीपासून काळजी घेणे हे कुठेही सारखेच असेल म्हणा. पण काय केले तर म्हातारपण ह्या देशात सोपे होईल यावर इथे बोलता येईल. जसे म्हातारपणी बाथरूममध्ये धरायला हँडलस लावावेत वगैरे किंवा अजून काही. हा पॉईंट मला नीट मांडता आला नाही खरे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घर असेल तर पायऱ्या काढून किंवा दुसऱ्या ठिकाणी रॅम्प बनवून घ्यावा म्हणजे यदाकदाचित कोणास व्हीलचेअरवर बसण्याची वेळ आलीच तर नेणे आणणे सोपे होते. अजून एक गोष्ट म्हणजे जड बॅग्स, सामान वगैरे पण आत नेणे सोपे जाते. म्हातारपणी अगदी २ पायऱ्या बॅगा उचलणे सुद्धा फार कठीण वाटू लागते.

१. सगळे घर एकाच मजल्यावर (तळमजल्यावर) असे जमते का पहा. वर खाली करण्यापेक्षा निवृत्तीनंतरचे घर Ranch Style घेण्याने खूप फरक पडेल
२. जिने असतील तर ते उतरायला आणि चढायला लिफ्ट बसवून घेता येते.
३. बाथरूम मधे टब काढून वॉकईन शॉवर

बाथरूमच्या दाराचे लॅच स्क्रू ड्राइव्हर, चमचा, नाणे घालून बाहेरुन सहज उघडता यायला हवे (स्पेशल टूल, किल्ली नको, नेहमी।वापर होत नाही म्हणुन त्या यथावकाश कुठेतरी ठेवल्या जाण्याची आणि वेळेवर न सापडण्याची संभाव्यता असते.) फक्त हे एकच लॅच असावे, बाहेरून उघडता येणार नाही असे दुसरे कुठलेही लॅच/कडी बसवू नये.
स्लाईडींग दार असेल तर बरे पडते असे वाटते.

शॉवरची जागा ओलांडुन मग कमोड असे नको.
कमोडची जागा केव्हाही कोरडी असावी. बाथरूमला मध्ये दार
आणि एका बाजूला शॉवर, दुसऱ्या बाजूला कमोड असे असेल तर उत्तम. उभी असेल तर आधी कमोड पुढे शॉवर.

व्हीलचेअर सरळ आणि सहज बाथरूम मध्ये घेऊन जाता आली पाहिजे आणि कमोडवर नेता आली पाहिजे.
बाथरूम मधून हाक मारल्यास बाहेर घरात ऐकु जाईल यासाठी वरच्या बाजुस उघडी खिडकी/व्हेंटिलेटर अथवा काही होल्स किंवा तत्सम सोय असावी.

छान माहिती गोळा होते आहे.
अजय, ह्या एका मजल्याच्या घराचा फायदा होतो, फक्त म्हातार्‍या लोकांनाच नाही. लेकीची ACL सर्जरी झाली तेव्हा सोपे गेले त्याच्यामुळे.

मैत्र, नातेसंबंध जोपासणे फार आवश्यक आहे. माणसे एकलकोंडी होतात. मला नवर्‍याची फार काळजी वाटते. मला इथे माबोसारख्या फोरमचा आधार आहे. त्याने असे काहीच जॉइन केलेत, ना आम्हाल मैत्र आहे. अर्थात फिझिकल मित्र-मैत्रिण काही पुरे पडणार नाहीतच. त्यांना त्यांचे आयुष्य आहे.
पण सांगायचा मुद्दा हा की सोशल इन्टरॅक्शन हवेच.
-------------------------------
व्यायामास पर्याय नाहीच पण निदान, अ‍ॅक्टिव्ह रहा. एका विशीष्ठ वेळापुरता बाहेर कोवळ्या उन्हात , वार्‍यात, गर्दी बघत बघत फेरफटका हा हवाच.
------------------------------------------
संगीतासारखे मधुर, गोड औषध नाही. तेव्हा आवर्जुन गाणी ऐका. नवनवीन संगीताची आवड जोपासा.
------------------------------------------