अजूनही मला पक्की माहिती मिळत नव्हती. .......

आमचे धोत्रे गुरुजी (भाग ७)

Submitted by मिरिंडा on 28 February, 2024 - 06:26

      अजूनही हवी तशी पक्की माहिती मिळत नव्हती.आम्ही हॉटेल वर परत आलो. विचार करता करता लक्षात आलं की त्या दिवशी मला दम देणारी माणसं शंकरभैया ऊर्फ शंकर पाटलाची होती. दोनतीन दिवसात फार काही साधेल असं वाटत नव्हतं. मलाही माझी नोकरी होती.बॉससुद्धा फार दिवस जमवून घेईल असं वाटत नाही.असो..... आता शंकर पाटलाचा वाडा शोधला पाहिजे. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता वगैरे झाल्यावर देखणे आणि पवार यांना न सांगता मी स्वतःच भटकायला निघालो. तसं आता बदलेलं गाव मी फारसं पाहिलं नव्हतं. भिडे आळीतून जाता जाता बरीच आरसीसी कन्स्ट्रक्शन दिसली. आमच्या वेळी जिथे जंगल होतं तिथे घरं दिसली.

Subscribe to RSS - अजूनही मला पक्की माहिती मिळत नव्हती. .......