उतरणीच्या भेटी
Submitted by anudon on 30 January, 2024 - 18:50
दुपारचं जेवण झालं. बाईंनी मागचं टेबल आवरलं, भांडी विसळून ती जागेवर लावून ठेवली. आणि त्या, “पुढचं दार लावून घ्या. मी येते संध्याकाळी येते” म्हणून गेल्या. रामरावांनी अंगणातली खुर्ची थोडसंच उन्ह अंगावर येईल अशा बेतानं ठेवली आणि सकाळच्या पेपरमधलं शब्दकोडं सोडवायला घेतलं. मन तसं निवांत होतं, कुठे जायचं नव्हतं आणि कुणी येणारही नव्हतं. मुलं परदेशात आपापल्या ठिकाणी, त्यांचे फोन आले तरी रात्री नाहीतर सकाळीच. त्यांची बायको निर्मलाला जाऊनही आता पाच वर्ष होत होती. ती गेल्यापासून त्यांचा दिनक्रम असाच असायचा. नशिबानं बाई चांगली मिळाली होती, म्हातारपणाच्या काळ्या छायेचं अस्तित्व त्यांना जाणवतं तर होतंच.
विषय:
शब्दखुणा: