निरोप
Submitted by अंतिम on 30 November, 2023 - 10:51
परतलात सारे घाई-घाईनं
सोडून माझ्यासाठी मागे
पावलांच्या ठश्यांचा निर्जीव कळप.
मी काही मागे येणार नव्हतो,
तुमचा माग काढत
इच्छाही नव्हती, की तुम्ही यावं परत.
फक्त इतकंच वाटलं होतं,
की त्या कोपर्यावरून अखेर जाताना
पहाल एकदाच मागे वळून.
द्याल सारेजण निरोप
निदान हात हलवून.
- पण तुमचे पाय बांधलेले होते
घड्याळाच्या हातांना....
विषय: