Submitted by अंतिम on 30 November, 2023 - 10:51
परतलात सारे घाई-घाईनं
सोडून माझ्यासाठी मागे
पावलांच्या ठश्यांचा निर्जीव कळप.
मी काही मागे येणार नव्हतो,
तुमचा माग काढत
इच्छाही नव्हती, की तुम्ही यावं परत.
फक्त इतकंच वाटलं होतं,
की त्या कोपर्यावरून अखेर जाताना
पहाल एकदाच मागे वळून.
द्याल सारेजण निरोप
निदान हात हलवून.
- पण तुमचे पाय बांधलेले होते
घड्याळाच्या हातांना....
मी ही आता नाही बसणार
नाही पाहाणार वळून,
परतही नाही येणार
भोगायला वार्षिक पाहुणचार.
नको आहेत उष्ण सुस्कार, आणि
उन्हात वाळणारे सहानूभुतीशुन्य पिंड.
जाईन असाच मुकाट,
टाचा पुढे करून...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जन पळभर म्हणतील हाय हाय ....
जन पळभर म्हणतील हाय हाय ....
आवडली..
आवडली..
सुंदर...
सुंदर...
सुन्न करुन गेली..
सुन्न करुन गेली..
शेवटची ओळ स्पष्ट करून सांगणार
शेवटची ओळ स्पष्ट करून सांगणार का?
छान कविता ..!
छान कविता ..!
टाचा पुढे करून... म्हणजे '
टाचा पुढे करून... म्हणजे ' नाका नाका पायलीभर चाखा'. दरवर्षी पिंड खायला येणार. शेवटची ओळ आवडली.
छान कविता ..!
छान कविता ..!